एक्स्प्लोर

Maharashtra 12 MLC case : मोठी बातमी : 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन ठाकरे गट आणि मविआला धक्का, हायकोर्टाने याचिका फेटाळली!

Maharashtra12 MLC case : बारा आमदारांच्या नियुक्तीवरुन हायकोर्टाकडून महायुतीला मोठा दिलासा मिळालाय.

Maharashtra12 MLC Case : राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. कैबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. महायुती सरकारला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरअध्यक्ष सुनील मोदी यांनी दाखल याचिका केली होती. मात्र, हायकोर्टाकडून महाविकास आघाडीचे याचिका फेटाळल्याने ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय. 

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोष्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन वाद रंगला होता.  महाविकास आघाडी सरकारनं 6 नोव्हेंबर 2020 रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 12 आमदारांच्या नावाची यादी पाठवली होती. ही यादी 5 सप्टेंबर 2022 रोजी मागे घेण्यात आली. यादी मागे घेण्याचा निर्णय कैबिनेटच्या बैठकीत घेण्यात आल्याचा दावा महायुती सरकारनं हायकोर्टात केला होता. मात्र कोणतीही कारणं न देता यादी मागे घेणं गैर असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता. 

सुप्रीम कोर्टात जाणार, सुनील मोदींची प्रतिक्रिया 

सुनील मोदी म्हणाले, कोर्टाने याचिका फेटाळली आहे.. पण मी या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे. कोर्टाची ऑर्डर मिळाल्यानंतर मी या संदर्भात सविस्तर बोलेन. न्यायालयाने कोणत्या आधारावर याचिका फेटाळली हे आम्ही पाहणार आहे. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्या संदर्भातली आपली याचिका आज न्यायालयाने फेटाळली.  घटनेचा आधार घेऊन याचिका फेटाळे आहे का हे आम्हाला तपासावा लागेल. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. कोश्यारी यांनी घटनेला धरून निर्णय घेतला नाही हा एकच मुद्दा आम्ही कोर्टासमोर मांडला होता. मात्र राजकीय सूडबुद्धीने हा निर्णय झाला नाही असं माझं ठाम मत आहे. मात्र या निर्णया विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात हे जाणार हे नक्की.... 

अंबादास दानवे म्हणाले, याचिका फेटाळली याची काही अडचण नाही. मात्र, राज्यपालांनी आम्ही दिलेली यादी का पेंडिग का ठेवली होती? हा मुद्दा आहे.. तेलंगणाच्या न्यायालयाने याबाबत एक निर्णय दिलेला आहे. आधीच्या सरकारने दिलेली यादी नंतरच्या सरकारने बदलली होती. त्यानंतर उच्च न्यायालयात गेल्यानंतर अगोदरच्या सरकारने दिलेली यादी कायम ठेवली होती. त्यामुळे याबाबत विचार करु. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Suresh Dhas on Walmik Karad : फ्लॅट, शाॅप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas on Walmik Karad : फ्लॅट, शाॅप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली
फ्लॅट, शाॅप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली
महाराष्ट्रात 'या' मार्गावर पहिली वंदे भारत स्लीपर; पुणे, मुंबईकर प्रवाशांनाही गुडन्यूज, डीआरएमने दिली माहिती
महाराष्ट्रात 'या' मार्गावर पहिली वंदे भारत स्लीपर; पुणे, मुंबईकर प्रवाशांनाही गुडन्यूज, डीआरएमने दिली माहिती
Nylon Manja : नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा, जखमेवर तब्बल 40 टाके, थोडक्यात वाचला जीव अन्यथा... नाशिकमधील धक्कादायक घटना
नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा, जखमेवर तब्बल 40 टाके, थोडक्यात वाचला जीव अन्यथा... नाशिकमधील धक्कादायक घटना
Gold Rate : सोन्याच्या दरात 215 रुपयांची वाढ, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या विविध शहरातील दर एका क्लिकवर
सोन्याच्या दरात 215 रुपयांची वाढ, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या विविध शहरातील दर एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray On Fadanvis Meet :फडणवीसांसोबत बैठकीत काय चर्चा झाली?आदित्य ठाकरेंनी सगळं सांगितलंABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas on Walmik Karad : फ्लॅट, शाॅप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली
फ्लॅट, शाॅप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली
महाराष्ट्रात 'या' मार्गावर पहिली वंदे भारत स्लीपर; पुणे, मुंबईकर प्रवाशांनाही गुडन्यूज, डीआरएमने दिली माहिती
महाराष्ट्रात 'या' मार्गावर पहिली वंदे भारत स्लीपर; पुणे, मुंबईकर प्रवाशांनाही गुडन्यूज, डीआरएमने दिली माहिती
Nylon Manja : नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा, जखमेवर तब्बल 40 टाके, थोडक्यात वाचला जीव अन्यथा... नाशिकमधील धक्कादायक घटना
नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा, जखमेवर तब्बल 40 टाके, थोडक्यात वाचला जीव अन्यथा... नाशिकमधील धक्कादायक घटना
Gold Rate : सोन्याच्या दरात 215 रुपयांची वाढ, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या विविध शहरातील दर एका क्लिकवर
सोन्याच्या दरात 215 रुपयांची वाढ, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या विविध शहरातील दर एका क्लिकवर
Pune Crime: बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली,  कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला अन्... पुण्याच्या आयटी कंपनीतील VIDEO फुटेज समोर
बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली, कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला अन्... पुण्याच्या आयटी कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज समोर
Anjali Damania : 'परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती; एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर....' अंजली दमानियांचा गंभीर आरोप
'परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती; एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर....' अंजली दमानियांचा गंभीर आरोप
Laxman Hake : वाल्मिक कराडसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांना माझ्यासकट जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी; धस, दमानिया, जरांगेंवर हल्लाबोल
वाल्मिक कराडसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांना माझ्यासकट जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी; धस, दमानिया, जरांगेंवर हल्लाबोल
परळीत 109 मृतदेह सापडलेत, पोलीस यंत्रणेवर वाल्मिक कराडांचा कंट्रोल, अंजली दमानिया संतापल्या..
परळीत 109 मृतदेह सापडलेत, पोलीस यंत्रणेवर वाल्मिक कराडांचा कंट्रोल, अंजली दमानिया संतापल्या..
Embed widget