Pune Crime News: मद्यधुंद अवस्थेमध्ये BMW कार रस्त्याच्या मधोमध थांबवली, लघुशंका अन् अश्लील चाळेही केले; पुण्यातील तरूणांचा प्रताप, VIDEO
Pune Crime News: मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे.

पुणे: पुण्यात काही दिवसांपुर्वी कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेमध्ये कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवल्याची घटना घडली होती. या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यासह देशभरात झाली. त्यानंतर आता मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध BMW गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे.
दारूच्या नशेत भर रस्त्यात त्यांनी अश्लील चाळे देखील केले आहेत. पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे. सिग्नलवरती BMW गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरूणांनी अश्लील कृत्य केलं. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या घटना यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच असं वर्तन करणाऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
