एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी, ATS च्या तपासात समोर

Pune Crime News : पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने कोर्टात दाखल केलेल्या अहवालात नमूद केली आहे.

Pune Crime News : पुणे पोलिसांनी (Pune Police) पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे आणि परिसरातील सुनसान जागी स्फोट करण्यासाठी बॉम्बस्फोट (Bomb Blast) करण्याची प्रॅक्टिस केल्याचं एटीएसच्या (ATS) तपासात समोर आलं आहे. दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने कोर्टात दाखल केलेल्या अहवालात नमूद केली आहे. दरम्यान त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याची (यूएपीए) कलमवाढ करण्यात आली आहे. 

या दोघांना मंगळवारी (25 जुलै) पुण्यातील विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली. महाराष्ट्र एटीएसने 22 जुलै रोजी तपास हाती घेतला आहे.

मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. 

इस्लामिक स्टेटसाठी काम करत असल्याचं समोर

दोन कॉन्स्टेबल्सनी मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युसुफ यांना हटकले असता त्यांनी त्यांची खोटी नावे सांगितली. मात्र पोलीस कॉन्स्टेबल्सनी ट्रु कॉलरच्या सहाय्याने फोन लावून पाहिला असता त्यांची वेगळीच नावे फोनवर दिसून आली. त्यानंतर पोलीसांनी ते दोघे रहात असलेल्या कोंढव्यातील घरी जाऊन तपास केला असता इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करत असल्याच समोर आलं आहे. त्यांच्याकडे महत्त्वाचे नकाशे आणि इतर साहित्य आढळून आलं. हे दोघेही बनावट नावाने गेल्या दीड वर्षापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.

तिन्ही दहशतवाद्यांनी केला होता जयपूरमध्ये घातपाताचा प्रयत्न

दोघा आरोपींना वाहन चोरीच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूर इथे घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत होती. एनआयएने मोहम्मद शहनवाज आलम याच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम देखील जाहीर केले आहे. हे दोघं 15 महिन्यापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. महत्त्वाची बाब म्हणजे भाड्याने राहत असताना घर मालकासोबत त्यांनी करारनामा देखील केलेला नव्हता. 

अतिरेक्यांकडे ड्रोन कॅमेरे

दरम्यान या दोन दहशतवाद्यांकडून ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचंदेखील समोर आले आहे. या चित्रीकरणात नेमकं काय आहे? पुण्यातील कोणत्या परिसरातील चित्रीकरण केलं आहे आणि यात पुण्यातील बाहेरचं चित्रीकरण केलं आहे का?, याचा तपास सुरु आहे. त्यासोबतच चार किलो केमिकल पावडर जप्त करण्यात आली आहे, जी विध्वंसक कारवायांसाठी ही पावडर वापरली जाते. 

हेही वाचा

Pune Crime News : पुण्यात 'ते' दोन अतिरेकी कशासाठी आले होते? त्यांचा प्लॅन काय होता? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP MajhaABP Majha Headlines :  10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
NEET Paper Leak Case : मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
MLC Election : काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेवर कुणाला संधी,  कोणत्या नेत्यांची नावं चर्चेत?
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेचा फैसला होणार? कुणाला संधी
Embed widget