एक्स्प्लोर

Pune Cyber Froud : उठ-सूट काहीही गुगल करुन नका! लष्करी जवानाने बँकेची माहिती गुगल केली अन् सायबर भामट्याच्या जाळ्यात आडकला, नेमकं काय घडलं?

बँकेसंदर्भात गुगलवरुन माहिती घेणं हे पुण्यातील एका जवानाला चांगलेच महागात पडलं आहे. यात या लष्करातील जवानाची  1 लाख 28 हजार 990 रुपयांची फसवणूक झाली आहे. 

पुणे : नवीन कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर सगळेच सध्या  (Pune Crime News) गुगलची मदत घेतात. आधारकार्ड, पॅनकार्डसंदर्भातील महत्वाची माहितीदेखील आपण गुगलवरुन घेतो. गुगलवर यासंदर्भातल्या अनेक महत्वाची माहिती देणाऱ्या बातम्या असतात. त्यात सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करुन आपण अनेकदा आपले कामं ऑनलाईन करतो. मात्र बँकेसंदर्भात गुगलवरुन माहिती घेणं हे (Cyber Crime) पुण्यातील एका जवानाला चांगलेच महागात पडलं आहे. यात या लष्करातील जवानाची  1 लाख 28 हजार 990 रुपयांची फसवणूक झाली आहे. 

नेमकं काय घडलं?

पुण्यातील एका लष्करी जवानाने  पंजाब येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची गुगलवरून माहिती घेतली होती.  मात्र गुगल सर्च करणं या लष्करी जवानाला महागात पडलं आहे. त्यांच्यावर सायबर चोराने डाव साधला आणि  बँक मॅनेजर बोलत असल्याचे सांगून 1 लाख 28 हजार 990 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी परवेशकुमार जोगंदर पाल (47 , रा. कॅम्प) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादीचे पंजाब राज्यातील पडोरी महंता जिल्हा गुरुदासपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियात जॉइंट अकाउंट आहे. हे अकाउंट बंद पडल्याने त्यांनी बँकेची माहिती गुगल सर्च करून पाहिली. त्यावेळी बँकेचा मोबाइल नंबर मिळाला. फिर्यादीने गुगलवरून मिळालेल्या नंबरवर यांनी फोन केला. त्यानंतर समोरुन सायबर चोरट्याने बँक मॅनेजर असल्याचे सांगितले. यानंतर चोरट्याने फिर्यादींना एक अॅप डाउनलोड करायला सांगितलं आणि फिर्यादीच्या मोबाइलची माहिती घेऊन पडोरी महंता येथील बँक अकाउंटमधून 1 लाख 28 हजार 990 रुपये परस्पर काढून घेतले.

यासंदर्भात माहिती मिळताच लष्करातील जवानाने पोलिसांत धाव घेतली. घडलेला सगळा प्रकार सांगितला. आपली फसवणूक झाल्याचं सांगितलं त्यानंतर हा प्रकार नेमका कोणी केला? याचं काही रॅकेट आहे का? नेमका कोणत्या शहरातून हे फ्रॉड केले जातात? या सगळ्याचा तपास लष्कर पोलीस करत आहे. 

पुण्यात सायबर क्राईमचा सुळसुळाट

मागील काही वर्षांपासून पुण्यात सायबर क्राईमचा सुळसुळाट दिसत आहे. मागील वर्षभरापासून अनेकांना ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या अनेक महिन्यात  फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.  गेल्या काही दिवसांपासून ॲानलाईन फसवणुकीचे अर्थात फिशींग  अनेक नवीन प्रकार या सायबर चोरट्यांनी आजमावले आहेत आणि याला नाहक बळी पडतोय तो म्हणजे सामान्य नागरिक. पोलिसांपेक्षा ॲानलाईन फसवणूक करणारे जास्त वेगवान झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. येत्या काळात सायबर गुन्हे थांबवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुण्यात एकाच दिवशी चाकू हल्ल्याच्या दोन घटना; पोटच्या पोरानेच आईवर केले सपासप वार; दुसऱ्या घटनेत दोघांवर भररस्यात हल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget