Pune Crime News : पुण्यात सडकछाप गावगुंडांची पोलिसांकडून वरात सुरुच; 32 पोलीस ठाण्यातून कुंडली काढत कारवाईचा धडाका
पुण्यातील नामचीन गुन्हेगारांची पुणे आयुक्तालयात परेड काढण्यात आली त्यानंतर आज लगेच गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकांकडून अवैध धंदे आणि अंमली पदार्थ तस्कारांची परेड काढण्यात आली.
![Pune Crime News : पुण्यात सडकछाप गावगुंडांची पोलिसांकडून वरात सुरुच; 32 पोलीस ठाण्यातून कुंडली काढत कारवाईचा धडाका Pune Crime News Pune CP amitesh Kumar parade of 200 to 300 criminals in the commissioner office pune pune drugs Pune Crime News : पुण्यात सडकछाप गावगुंडांची पोलिसांकडून वरात सुरुच; 32 पोलीस ठाण्यातून कुंडली काढत कारवाईचा धडाका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/07/dd36a55882a70a796fec1fa17b6953471707303264563442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यात सध्या नव्या आलेल्या पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांना चांगलंच धारेवर धरलं आहे. पुण्यातील सगळ्या नामचीन गुन्हेगारांची पुणे आयुक्तालयात परेड काढण्यात आली त्यानंतर आज लगेच गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकांकडून अवैध धंदे आणि अंमली पदार्थ तस्कारांची पोलीस आयुक्त कार्यालयात परेड काढण्यात आली. मागील काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करीची प्रकरणं समोर आली त्यामुळे गुन्हेगारांनादेखील नवनियुक्त आयुक्तांनी दम दिला आहे.
अवैध काम मटका, जुगार, क्लब, लॉटरी, अवैध पत्त्यांचा क्लब चालविणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आज गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाकडून बोलविण्यात आले होते. यावेळी 60 अवैध यांची परेड घेण्यात आली. यात नाईक, आंदेकर, कुंभार, याच्यासह चर्चित अवैध व्यावसायिकांना अवैध काम आढळून आल्यास मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
पुणे पोलिसांकडून कालच्याप्रमाणे आजदेखील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात बोलावण्यात आलंआहे. ज्यांच्या नावावर सातत्याने वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे असे हे स्थानिक पातळीवरचे गुन्हेगार आहेत. कालच्याप्रमाणे टोळी प्रमुख यामध्ये नसले तरी दोनशेच्या आसपास स्थानिक गुन्हेगार पोलिसांकडून आज हजारीसाठी बोलावण्यात आले आहेत. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा फॉर्म भरून घेतला जाईल. यामध्ये शस्त्रे, अमली पदार्थ आणि स्थानिक पातळीवरील गुन्ह्यात आरोपी असलेल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुण्यातील पाचशेहून अधिक गुन्हेगारांचा समावेश आहे. 32 पोलीस ठाण्यात रेकॉर्ड असलेल्या गुन्हेगारांना बोलावण्यात आलं आहे. सध्या पोलीस आयुक्तालयात रोज गुड्यांची परेड पाहायला मिळत आहे. यामाध्यामातून गुंडांचा सज्जड दम देताना दिसत आहे.
अमितेश कुमार हे अॅक्शन मोडवर
पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार हे अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी हेल्मट सक्तीवर नजर ठेवणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर बैठकीत पुण्यातील सगळ्यात पोलीसांना विविध सूचनादेखील केल्या होत्या. त्यानंतर शहरातील अट्टल आणि गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या शिवाय यापुढे त्यांच्याकडून कोणताही गुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. आपल्या परिसरातील फाईलवरचे गुन्हेगार ओळखून त्यांचा योग्य तो बंदोबस्त करा, असंही ते म्हणाले होते.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)