Pune News : पुण्यातील एनडीए परिसरात सापडला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट
शिवणे एनडीए परिसरात बाँब सापडल्याने मोठी खळबळ उडाली. शिवणे एनडीए परिसराला लागून असलेल्या कमळजाई मंदिर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना एक बॉम्ब आढळला होता.
पुणे : शिवणे एनडीए परिसरात बाँब (Pune Bomb) सापडल्याने मोठी खळबळ (Pune news) उडाली. शिवणे एनडीए परिसराला लागून असलेल्या कमळजाई मंदिर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना एक बॉम्ब आढळला होता. पोलिसांनी बॉम्ब नाशक पथकाच्या साहाय्याने तो एनडीएच्या जंगलात नेऊन स्फोटकांच्या साहाय्याने त्याचा स्फोट घडवून आणला आणि बॉम्ब नष्ट केला. एनडीएसारख्या देशातील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब सापडल्याने परिसरात भीती पसरली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एनडीए रस्त्यावरील कमळजाई मंदिर आहे, या मंदिराजवळच एका ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाच्या खोदकामादरम्यान दुपारच्या सुमारास मजुरांना बॉम्बसदृश्य वस्तू आढळली. यावेळी कामगारांनी घाबरून याबाबत ठेकेदाराला कळवले.हे सगळं पाहून ठेकेदाराने तत्काळ पोलिसांना सांगितले.
त्यानंतर खोदाई दरम्यान सापडलेला बॉम्ब उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच बॉम्ब शोधक पथकाला बोलावलं आणि तपासणी करायला सांगितली. त्यात मात्र अतिशय कमी शक्तीचा आणि जुना असल्याने क्षीण झालेला असल्याचा निष्कर्ष बीडीडीएस पथकाने काढला. त्यानंतर हा बॉम्ब निर्मनुष्य भाग असलेल्या एनडीएच्या जंगलात नेऊन स्फोटकांच्या साहाय्याने त्याचा स्फोट करण्यात आला. . शेजारीच एनडीएची हद्द आहे, त्यांच्या सरावादरम्यान खूप वर्षांपूर्वी हा बॉम्ब तिथे पडलेला असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदा खरोखर बाँब सापडला आहे. मात्र यापूर्वी अनेकदा बाँब सापडल्याचे किंवा आढळल्याच्या अफवा समोर आल्या आहेत. त्या पुणे स्टेशन, विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे कॉल्स नियंत्रण कक्षाला आले आहेत. त्यासोबतच बॉम्बने पुणे स्टेशन उडवून देण्याच्या धमक्यादेखील आल्या आहेत. या अशा धमक्यांमुळे संपूर्ण पोलीस पथक कामाल लागतं त्यासोबत बॉम्बशोधक आणि नाशक पथकदेखील कामाला लागतं. मात्र अनेकदा हे फोन आणि धमक्या फेक असल्याचं समोर येतं. त्यामुळे आता या सगळ्या फोन करणाऱ्यांचा तपास करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. आता मात्र एनडीए परिसरात खरोखरच बाँब सापडल्याने काही प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र तो सरावादरम्याम पडलेला असण्याची शक्यता वर्तवल्याने अनेकांनी उसासा सोडला.
इतर महत्वाची बातमी-
इतर महत्वाच्या बातम्या
- पुण्यात भाजपच्या हालचालींना वेग, उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यात तळ ठोकून, रात्रीच्या बैठकानंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र
- Baramati Lok Sabha Election: पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापकाचं निलंबन, मतदानाच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत खुली होती बँक