क्रुरतेचा कळस..! चारित्र्याच्या संशय अन् वाद, पत्नीला मारहाण करत धारधार शस्त्राने वार; पुण्यातील घटना
Crime News: कौटुंबिक वादातून दोन महिलांचा खूनाचा प्रयत्न करणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये सहकारनगर, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे: पुण्यात कौटुंबिक वादातून दोन महिलांचा जीव घेण्याच्या दोन घटना काल (मंगळवारी) घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यांच्यात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे, असं असतानाच आता वादातून दोन महिलांचा खूनाचा (Pune Crime News) प्रयत्न करणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये सहकारनगर, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांमुळे पुन्हा एकदा महिला आपल्या घरात देखील सुरत्रित नसल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण
चारित्र्याचा संशय घेत आणि कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपलया पत्नीचा गळाचा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर भागातील तळजाई परिसरात घडली आहे. याप्रकरणी सत्यवान अनिल मोहिते (वय 26, रा. शेळगाव, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहितेच्या पत्नीने सहकारनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. मोहिते पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्याचबरोबर कौटुंबिक वादातून तिचा छळ करत होता. 24 ऑगस्टला त्याने पत्नीला मारहाण (Pune Crime News) केली. त्यानंतर तिचा गळा दाबला त्यावेळी पत्नी बेशुद्ध पडली. या घटनेनंतर मोहिते घराला बाहेरून कडी लावून पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, यांचा काहीच महिन्यांपुर्वी विवाह झाला होता. मात्र, त्यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झालं. तेव्हा पतीने पत्नीला मारहाण केली. त्याचबरोबर, ती बाहेर जात असताना तिचा गळा दाबला. तिला खाली पाडून पुन्हा दोन्ही हाताने ठार मारण्याच्या (Pune Crime News) उद्देशाने गळा दाबला. त्यात पत्नी बेशुद्ध झाली. त्यानंतर पतीने घराला बाहेरून कडी लावून पळ काढला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
नांदण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर चाकूने वार
सासरी नांदण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर चाकूने वार (Pune Crime News) केल्याची घटना अप्पर इंदिरानगर परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी राजवली हरुण मुलाणी (रा. शहाजी नगर. बावडा, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पत्नीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला गेल्या वर्षापासूनपतीपासून वेगळी राहत होती. इंदिरानगर परिसरातील नातेवाईकांच्या घरात ती भाड्याने राहते. मुलाणी पत्नीला नेण्यासाठी आला तेव्हा पत्नीने त्याच्याबरोबर नांदण्यास नकार दिला. त्याने पत्नीवर चाकूने वार केले. पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.