एक्स्प्लोर

Nilesh Ghaywal: निलेश घायवळच्या घरच्या झडतीत सापडला 'ॲम्युनेशन बॉक्स'; फॅक्टरीशी पोलिसांचा पत्रव्यवहार, घरात बॉक्स रिकामाच पडलेला, काडतुसे गेली कुठे...? पोलिसांचा शोध सुरू

Nilesh Ghaywal: घराच्या झडतीमध्ये एक ॲम्युनेशन बॉक्स (बंदुकीच्या गोळ्या ठेवण्याचा बॉक्स) आढळून आला आहे. हा बॉक्स रिकामा असला तरी तो बॉक्स निलेश घायवळला कसा मिळाला याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे.

पुणे : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणात चर्चेत आलेला गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्यावर पुणे पोलिसांकडून आतापर्यंत वेगवेगळ्या गंभीर प्रकाराचे दहा गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. पोलिसांकडून निलेशची (Nilesh Ghaywal) आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोथरूड परिसरातील पोलिसांनी (Pune Police) घेतलेल्या त्याच्या घराच्या झडतीत दोन काडतुसे तसेच चार पुंगळ्या जप्त केल्या होत्या. याप्रकरणी घायवळविरोधात (Nilesh Ghaywal) कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्या घराच्या झडतीमध्ये एक ॲम्युनेशन बॉक्स (बंदुकीच्या गोळ्या ठेवण्याचा बॉक्स) आढळून आला आहे. हा बॉक्स रिकामा असला तरी तो बॉक्स निलेश घायवळला कसा मिळाला याचा तपास पुणे पोलिसांकडून (Pune Police) केला जात आहे.

Ammunition box found: पिस्तुलाच्या गोळ्या ठेवण्यासाठी बॉक्स असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले

मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गुंड निलेश घायवळ सध्या स्वीत्झर्लंडलमध्ये आहे. त्याने घायवळऐवजी गायवळ नावाचा वापर करत पासपोर्ट मिळवला असल्याचे यापूर्वीच पोलिस तपासात समोर आले आहे. सोमवारी तारीख. ६ रोजी पोलिसांनी घेतलेल्या घरझडतीमध्ये त्याच्या घरातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जिन्यात इन्व्हर्टरचा एक लोखंडी बॉक्स होता. पोलिसांनी (Pune Police) तो बॉक्स उघडून बघितला असता त्यात इन्व्हर्टरच्या मागे एक लोखंडी बॉक्स आढळला. तो बॉक्स खाली काढून बघितला असता, पिस्तुलाच्या गोळ्या ठेवण्यासाठी बॉक्स असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले. त्या बॉक्सवर २०१७ वर्षाचा उल्लेख असून, ५.५६ एमएम असे लिहिलेले आहे.

Ammunition box found: घरात बॉक्स रिकामाच पडलेला, काडतुसे गेली कुठे...? 

पोलिसांना बॉक्स मिळाला तेव्हा त्यात एक सत्तूर (मोठा सुरा) पोलिसांना सापडला होता. त्या व्यतिरिक्त बॉक्समध्ये एकही काडतूस आढळलेले नाही. संबंधित बॉक्समध्ये ३०० काडतुसे बसण्याची जागा असते. त्यामुळे त्यातील काडतुसे कुठे गेली, हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

Ammunition box found: कुणाला दिला याचा रेकॉर्डदेखील मागवण्यात आला

पोलिसांनी खडकी येथील ॲम्युनेश फॅक्टरीसोबत या प्रकरणात पत्रव्यवहार केला असून, हा बॉक्स नेमका कोणत्या ॲम्युनेश फॅक्टरीतून बाहेर आला आहे. याबाबत माहिती विचारण्यात आली आहे. तसेच बॉक्स फॅक्टरीबाहेर कसा आला, कुणाला दिला याचा रेकॉर्डदेखील मागवण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी निलेश घायवळच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mirzapur Train Accident: कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
Pune Crime: कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील भोंदूबाबाचा बंगला ओस पडला, सगळे कर्मचारीही गायब,  वेदिका पंढरपूरकर फरार
कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील भोंदू मांत्रिकाचा बंगला ओस पडला, सगळे कर्मचारीही गायब, वेदिका पंढरपूरकर फरार
Solapur Politics: नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Rahul Gandhi: मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ECI vs Opposition: निवडणूक आयोगाने भेट नाकारली, मनसे-मविआ नेत्यांचा दिल्लीत ठिय्या
Pre-Poll Bonanza: निवडणुका जाहीर होण्यापूर्वी Fadnavis सरकारचा घोषणांचा धडाका, काही तासांत २२१ GR
Solapur Floods: केंद्रीय पथकाचा 'रात्रीस खेळ चाले', Mohol मध्ये अंधारात पाहणी केल्याने टीकेची झोड
Poster War: 'दगाबाजरे पॅकेजचं काय झालं?', Thackeray गटाचा CM Shinde, DCM Pawar यांना थेट सवाल
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शेतकरी आक्रमक, सरकारकडे मदतीची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mirzapur Train Accident: कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
Pune Crime: कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील भोंदूबाबाचा बंगला ओस पडला, सगळे कर्मचारीही गायब,  वेदिका पंढरपूरकर फरार
कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील भोंदू मांत्रिकाचा बंगला ओस पडला, सगळे कर्मचारीही गायब, वेदिका पंढरपूरकर फरार
Solapur Politics: नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Rahul Gandhi: मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
Uddhav Thackeray In Marathwada: शेतकऱ्यांनो शेतकरी म्हणून एकवट व्हा, जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत कोणी न्याय देणार नाही; उद्धव ठाकरेंची बांधावरून आर्त साद
शेतकऱ्यांनो शेतकरी म्हणून एकवट व्हा, जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत कोणी न्याय देणार नाही; उद्धव ठाकरेंची बांधावरून आर्त साद
Pune Leopard Attack: ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला,  दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला, दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
Embed widget