एक्स्प्लोर

Pune Crime News : 10 वर्षाच्या नातीचं धाडस; आजीच्या गळ्यातील चैन ओढणाऱ्या चोराला रस्त्यावर धू धू धुतला

चैन हिसकावण्यासाठी आलेल्या व्यक्तीने वृद्ध महिला आणि 10 वर्षीय मुलीला मारहाण करून तेथून पळ काढला. या घाटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Pune Crime News : चेन स्नॅचिंगच्या घटना आपल्याला (Pune crime) सहसा ऐकायला मिळतात. अशीच एक घटना पुणे शहरात पाहायला मिळाली आहे. चैन हिसकावण्यासाठी आलेल्या चोराला वृद्ध महिला आणि 10 वर्षीय मुलीने चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चेन स्नॅचिंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीत रात्री आठच्या सुमारास एक वृद्ध महिला आपल्या दोन नातवंडांसह घरी परतत असताना ही घटना घडली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेन स्नॅचचा प्रयत्न केला. दरम्यान स्कूटीवर बसलेला एक व्यक्ती एका वृद्ध महिलेजवळ थांबला आणि तिला कुठल्यातरी जागेचा पत्ता विचारु लागला. महिला गाडीजवळ येताच त्या व्यक्तीने महिलेच्या गळ्यावर जोरात वार करुन साखळी ओढण्याचा प्रयत्न केला.

वृद्ध आणि 10 वर्षांच्या मुलीने आरोपीला बेदम मारहाण केली

यादरम्यान, वृद्ध महिलेने आरोपीचा हात पकडून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी वृद्ध महिलेसोबत उभी असलेली 10 वर्षांची मुलगीही आरोपीवर तुटून पडली आणि तिच्या हातातील पिशवी घेऊन तिला मारहाण करु लागली. दुसरीकडे आरोपीने स्वतःला घेरलेले पाहून घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे.

ही घटना 25 फेब्रुवारीला घडली आहे. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोयता गॅंगची दहशत असतानाच आता शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनेत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात असे प्रकार घडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुनसान रस्त्यावर अनेकदा असे प्रकार समोर येत आहेत. भर दुपारी नाही तर रात्रीच्या वेळेत हे चोर थेट वृद्ध महिलांवर हल्ला करुन किंवा त्यांना दमदाटी करुन त्यांना लुटण्याचे प्रकार सर्रास सुरु आहे.

 

कोयता गॅंगची दहशत कायम

पुण्यात पुन्हा कोयता गॅंग (Koyta gang) सक्रिय झाली आहे. आम्ही (Pune Crime) एरियामधील भाई म्हणत चार तरुणांनी कोयते घेऊन दहशत माजवली होती. पुण्यातील उत्तमनगर भागात चार जणांनी कोयता घेऊन पुन्हा एकदा दहशत निर्माण केली होती. यामुळे परिसरात सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या चारही जणांना पुणे पोलिसांन अटक केली होती. त्यानंतर आता भुरट्या चोरांचं प्रमाण वाढलं आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Embed widget