Pune Corona : पुण्यातील रुग्णसंख्या वाढली, शहरात 8,301 रुग्णांची नोंद तर 4 रुग्णांचा मृत्यू
Pune Corona Updates : पुण्यामधील एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या 3.19 टक्के रुग्ण हे रुग्णालयाच उपचार घेत आहेत.
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात पुणे महापालिका क्षेत्रात 8,301 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 5,480 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 45,081 इतकी झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात एकूण 20,338 लोकांची चाचणी करण्यात आली आहे. पुण्यामध्ये सक्रिय रुग्णसंख्येच्या तुलनेत 3.19 टक्के रुग्णसंख्या ही रुग्णालयात उपचार घेत आहे. पुण्यात आतापर्यंत 9,172 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गुरुवारी पुणे शहरात 7,264 रुग्ण सापडले होते तर 7 जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत आज जवळापस एक हजाराहून जास्त रुग्णांची भर पडली आहे.
राज्यातील स्थिती
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 48 हजार 270 नव्या रुग्णांची भर पडली असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 42, 391 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.91 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 09 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.47 टक्के आहे. सध्या राज्यात 23 लाख 87 हजार 593 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 29 लाख 51 हजार 593 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
- Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 48 हजार 270 नव्या रुग्णांची भर तर 52 रुग्णांचा मृत्यू
- Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 5,008 कोरोना रुग्णांची नोंद तर 12 जणांचा मृत्यू
- शाळांपाठोपाठ आता राज्यातली महाविद्यालयेही सुरु होण्याची शक्यता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव