एक्स्प्लोर

Pune Mini Lockdown : पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर्ससह PMPMLची बससेवा बंद

Pune Corona Lockdown: पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद रहतील.  मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील. मॉल आणि थिएटर्स देखील सात दिवसांसाठी बंद राहतील.

Pune Corona Lockdown: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. त्यात पुणे, मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सगळी हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद रहतील.  मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील. मॉल आणि थिएटर्स देखील सात दिवसांसाठी बंद राहतील.

सोबतच पुण्याची  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली PMPMLची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद असतील.  मात्र कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करु शकतील. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. हे सगळे निर्बंध उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून लागू होतील.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं की, पुढील शुक्रवारी या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल. त्यांनी सांगितलं की, संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार बंदी असली तरी अन्नाची होम डिलीव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तसेच दिवसा पुण्यात जमावबंदी असेल. लग्न समारंभ आणि अंत्यविधी सोडून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. पुण्यातील वाईन शॉप संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहतील. बार, रेस्टॉरंट बंद राहणार असली तरी वाईन शॉप सुरू राहतील.

सौरभ राव यांनी सांगितलं की, मागील आठवड्यात पुण्यात पॉझिटीव्हीटी रेट 32 टक्के होता.  गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात दररोज जवळपास आठ हजार रुग्ण आढळून आले.  परिस्थिती अशीच राहिली तर येत्या आठवड्यात दररोज नऊ हजार रुग्ण आढळून येतील. काल  आर्मी आणि खाजगी हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत बैठक झाली आणि बेड वाढवण्याचा निर्णय झाला आहे. काही हॉस्पिटल्स 100 टक्के कोव्हिड साठी वापरण्याची वेळ येऊ शकते. पुण्यात इतर शहरांमधील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतायत. पश्चिम महाराष्ट्रील पाचही जिल्ह्यांमध्ये बेडची संख्या वाढवण्याचा निर्णय झाला आहे.  त्याबद्दल त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.

ते म्हणाले की, मायक्रो कंटेनमेंट झोनमधे नियमांची आणखी कडक अंमलबजावणी केली जाईल. काल एका दिवसात पावणे तीनशे बेड वाढवण्यात आले आहेत. आज अडीचशे बेड वाढवण्यात आलेत. येत्या काही दिवसात आणखी बेड वाढवण्यात येतील. कोरोना रुग्णांच्या बिलांची ऑडीट पुन्हा सुरू करण्यात येतंय. जेणेकरुन खाजगी हॉस्पिटल्सकडून अतिरिक्त पैसै घेतले जात नाहीत ना यावर लक्ष राहील, असं त्यांनी सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sangli Lok Sabha Election:मविआत जुंपली, तर भाजपचा प्रचार सुरु;सांगलीतील पत्रकारांचा निवडणुकीचा अंदाजJalna Lok Sabha : Jarange-Vanchit सामाजिक युतीचे फायदे-तोटे; कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय?ABP Majha Headlines : 9 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Embed widget