Pune Chandni Chowk : पुण्यातील चांदणी चौकात एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, वाहतूक व्यवस्था विस्कळीत
चांदणी चौकातील उड्डाणपूल कधी पडणार कारण दरवेळेस तारीख पुढे ढकलली जाते. लवकरात लवकर या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करावी अशी मागणी होत आहे
पुणे : पुण्यातील चांदणी चौकाच्या (Chandani chowk) पुलाचं पाडण्याचं काम पुढे ढकलण्यात आलं आहे. सततच्या पावसमुळे आणि इतर कारणांमुळे चांदणी चौकातील पूल पाडण्यास उशीर होत आहे. त्यामुळे सकाळीन बावधन, हिंजवडी, पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. दरम्यान येत्या 25 पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास या वाहतूक कोंडीमुळे होत आहे. सकाळी जवळपास नागरिक दीड ते दोन तास अडकून पडले. मुंबईला जाणाऱ्या लोकांना सुद्धा याचा मोठा फटका बसला. चांदणी चौकातील उड्डाणपूल कधी पडणार कारण दरवेळेस तारीख पुढे ढकलली जाते. लवकरात लवकर या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करावी अशी मागणी होत आहे
चांदणी चौकातील या पुलावर अनेक सेवावाहिन्या आहेत. महापालिकेच्या माध्यामातून यातील काही सेवा वाहिन्या काढण्यात आल्या आहेत किंवा काही वळवण्यात आल्या आहेत. ज्या वाहिन्यांचं काम शिल्लक आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्यामुळे जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पूल पाडता येणार नसल्याचं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला अन् मुख्यमंत्र्यांनी पूल पाडण्याचा आदेश दिला
पुण्यातील चांदणी चोकात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्र्यांना देखील बसला. यासाठी पुणेकरांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचा ताफा याच वाहतूक कोंडीत अडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेत हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार NHAI कडून पाहणी करण्यात आली आणि येत्या 18 सप्टेंबरला हा पूल जमीनदोस्त करण्यात येणार होता.