एक्स्प्लोर

Pune Car Accident: मोठी बातमी: आमदाराच्या फोननंतर धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकल्याची चर्चा, तो आमदार कोण?

Pune News: पुणे अपघात प्रकरणानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनिकपुत्राला वाचवण्यासाठी एका आमदाराने ससून रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करुन त्याचे ब्लड सॅम्पल बदलायला लावले. डॉ. अजय तावरेंना पोलिसांकडून अटक.

पुणे: पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणातील आरोपी असणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी  शासकीय यंत्रणांमधील काही अधिकारी आणि कर्मचारी कशाप्रकारे काम करत होते, याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्या मुलाने कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडले (Pune porsche car accident) होते. यावेळी या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते. मात्र, त्याच्या अल्कोहोल टेस्टचा रिपोर्ट नेगेटिव्ह यावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी या धनिकपुत्राचे रक्ताचे नमुनेच बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यामुळे आता अल्पवयीन आरोपीच्या रक्तात मद्याचे अंश नसल्याची बाब कायदेशीर लढाईत त्याच्या पथ्यावर पडू शकते. डॉ. अजय तावरे (Ajay Taware) यांच्या सांगण्यावरुन डॉ श्रीहरी हळनोर यांनी धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले आणि त्याजागी एका दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने ठेवून दिले. त्यानंतर धनिकपुत्राच्या रक्ताचे सॅम्पल्स डॉ. हळनोर यानी कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिल्याचे उघड झाले होते. विशाल अग्रवाल यानेही डॉ. अजय तावरे यांना फोन केल्याची माहिती फोन कॉल्सच्या डिटेल्समधून समोर आली आहे.   

यानंतर आता याप्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. कल्याणीनगर परिसरात  रविवारी पहाटे अपघात झाल्यानंतर काहीवेळातच एका आमदाराचा डॉ. अजय तावरे यांना फोन आला. या आमदारानेच डॉ. अजय तावरे यांना धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल्स बदलण्यास सांगितले का, अशी चर्चा आता सुरु आहे. डॉ. तावरे हे ससून रुग्णालयात मोठ्या पदावर आहेत. ते ससूनमधील प्रतिष्ठित डॉक्टरांपैकी एक आहेत. या सगळ्यानंतर आता डॉ. तावरेंना फोन करणारा आमदार नक्की कोण,याची चर्चा रंगू लागली आहे.

डॉ. अजय तावरेंच्या नियुक्तीसाठी आमदाराचं शिफारस पत्र

ससून रुग्णालयात डॉक्टरांनी धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल्स बदलण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता नवनवीन माहिती समोर येत आहे. डॉ. अजय तावरे यांचे राजकीय लागेबांधे असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. अजय तावरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहे. डॉ. तावरे यांनी यापूर्वीही ब्लड सॅम्पल्स बदलण्यासारखी कामे केल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले. 29 डिसेंबर 2023 रोजी अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते. तर हसन मुश्रीफ यांनीही तावरे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते. 

आणखी वाचा

लाडोबाला वाचवण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांना पैसे चारले; विशाल अग्रवालवर धडाधड गुन्ह्यांची नोंद, जेलमधला मुक्काम वाढणार

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yashomati Thakur on Alhad Kaloti: फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
CM नितीश कुमारांपेक्षा 30 पट जास्त संपत्ती, कोण आहेत मंत्री रमा निषाद, बिहारमधील भाजपचा चेहरा?
CM नितीश कुमारांपेक्षा 30 पट जास्त संपत्ती, कोण आहेत मंत्री रमा निषाद, बिहारमधील भाजपचा चेहरा?
DK Shivkumar: 'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shourya Patil Sangli : सांगलीच्या शौर्यने आयुष्य का संपवलं?  वडिलांनी सगळं सांगितलं
Jaykumar Gore : नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील
Bihar CM Nitish Kumar Oath मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी
PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yashomati Thakur on Alhad Kaloti: फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
CM नितीश कुमारांपेक्षा 30 पट जास्त संपत्ती, कोण आहेत मंत्री रमा निषाद, बिहारमधील भाजपचा चेहरा?
CM नितीश कुमारांपेक्षा 30 पट जास्त संपत्ती, कोण आहेत मंत्री रमा निषाद, बिहारमधील भाजपचा चेहरा?
DK Shivkumar: 'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवी राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवी राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
Shaurya Patil: माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
Embed widget