Pune Bypoll election : किंगमेकर अॅक्शन मोडवर! गिरीश बापटांची आधी प्रचारातून माघार फडणवीसांच्या भेटीनंतर थेट मैदानात उतरणार
Pune Bypoll election : कसबा पोटनिवडणुकीसाठी कसब्याच्या किंगमेकर खासदार (Pune Bypoll Election) गिरीश बापट यांनी मैदानात उतरण्याता निर्णय घेतला आहे.
Pune Bypoll election : कसबा पोटनिवडणुकीसाठी कसब्याच्या किंगमेकर खासदार (Pune Bypoll Election) गिरीश बापट यांनी मैदानात उतरण्याता निर्णय घेतला आहे. आजारी असूनही ते आज नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. काल (15 फेब्रुवारी) गिरीश बापटांनी आजारपणामुळे प्रचारात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
खासदार गिरीश बापट आणि संजय काकडे या दोघांच्या काल भाजप नेत्यांनी भेटी घेतल्यावर या दोघांनीही कसबा पेठ मतदारसंघातील निवडणुकीत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार गिरीश बापटांच्या अध्यक्षतेखाली टिळक कुटुंबीयांच्या केसरी वाड्यात भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. मुक्ता टिळक यांचे कुटुंबीय देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे.
आजारी असूनही प्रचारासाठी मैदानात उतरणार
कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी कालपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. प्रचाराची रणनीती आणि पोटनिवडणुकीचं नियोजन करण्यासाठी बैठकींचं सत्र सुरु आहे. काल देवेंद्र फडणवीसांनी गिरीश बापट यांची घोले रोड परिसरात भेट घेतली. त्यासोबतच त्यांनी अनेक नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचीदेखील भेट घेतली. या भेटीनंतर गिरीश बापट आजारी असूनही प्रचारासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
आधी माघार... नंतर थेट मैदानात
कालच(15 फेब्रुवारी) ला कासदार गिरीश बापट यांनी आजारपणाचं कारण देत प्रचारातून माघार घेतली होती. त्यांनी पत्र काढत यासंदर्भात माहिती दिली होती. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झाली. गेले तीन महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे खूप कमी काम केले असून तरीसुद्धा मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणाच्या कारणास्तव सदर पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरुन प्रचार करु शकणार नाही, असं त्यांनी पत्राद्वारे सांगितलं होतं. कसबा मतदारसंघात गिरीश बापटांची मागील अनेक वर्षांपासून सत्ता होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत गिरीश बापटांना किंगमेकर म्हटलं जातं. मुक्ता टिळकांच्या निवडणुकीच्या वेळीदेखील त्यांची प्रचारात महत्वाची भूमिका होती. मात्र पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांनी आजारपणाचं कारण देत घरोघरी जाऊ शकत नाही, असं सांगत माघार घेतली होती. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात होता. आता मात्र ते प्रचार करणार आहेत. त्यामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे.