Pune Bypoll election : रविंद्र धंगेकरांंचा प्रचार करणाऱ्या सात मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी
कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करणाऱ्या मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कार्य केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.
![Pune Bypoll election : रविंद्र धंगेकरांंचा प्रचार करणाऱ्या सात मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी Pune Bypoll election MNS Raj Thackeray removed office bearer who work congress candidate ravindra dhangekar in kasba bypoll election Pune Bypoll election : रविंद्र धंगेकरांंचा प्रचार करणाऱ्या सात मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/8c07a4696363b7c8295c2b545c127c211677134173316442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Pune Bypoll Election : कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांचा (Pune Bypoll election ) प्रचार करणाऱ्या मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कार्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांनी पक्षात राहून कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रकार केला, त्यामुळे 7 मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडून (Raj Thackeray) बाहेरचा रस्ता (MNS) दाखवण्यात आला आला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, नीलेश कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असं शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी जाहीर केलं आहे. पत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली आहे. "गेल्या काही वर्षांपासून हे लोक पक्षात कार्यरत नाहीत. पक्षाच्या कोणत्याही कामात किंवा कार्यक्रमात हे लोक सक्रिय नसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे", असं बाबर यांनी जाहीर केलेल्या पत्रात लिहिलं आहे.
पुण्यातील पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र या निवडणुकीच्या प्रचार करणार नाही, असंही त्यांनी पाठिंबा देताना जाहीर केलं होतं. या संदर्भात मनसेची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, हेमंत संभूस, अजय शिंदे, गणेश सातपुते, योगेश खैरे, रणजित शिरोळे, बाळा शेडगे, साईनाथ बाबर आदी उपस्थित होते. बैठकीत भाजपला मदत करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना थेट प्रचार करता येणार नाही. मात्र तुम्ही वैयक्तित पातळीवर प्रचार करता येईल, असं या बैठकीत सांगण्यात आलं आहे.
Pune Bypoll election : "भाजपचं मतदान वाढेल, असा प्रयत्न करा"
पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून मनसे नेमकं कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र मनसैनिक प्रचार करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार मनसैनिक प्रचारात सहभागी न होता वैयक्तित पातळीवर भाजपचं मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे, असं मनसैनिकांना सांगण्यात आलं होतं. मनसेनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांची प्रचारयात्रा थेट पुण्यातील मनसेच्या कार्यालयात धडकली होती. त्यावेळी शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे नेते बाबु वागस्कर यांनी धंगेकरांचं जय्यत स्वागत केलं होतं. त्यानंतर पुण्यात चर्चेला उधाण आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)