Sanjay Raut : पोटनिवडणुका होणारच, महाविकास आघाडीच जिंकणार; संजय राऊतांनी थेटच सांगितलं
कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व्हावी, अशी लोकांची इच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
Sanjay Raut : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व्हावी, अशी लोकांची इच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. त्यामुळं दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवणार असून, या दोन्ही जागा जिंकणार असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. ते आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कसब्याची जागा काँग्रेस (Congress) लढवणार आहे. तर चिंचवडच्या जागेबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना इच्छुक असल्याचेही राऊत म्हणाले.
राज्यातील वातावरण सरकारच्या विरोधात
राज्यातील वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नसल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यामुळं आम्ही कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. विधानपरिषदेच्या निकालावरुन सरकार विरोधात असणारं वातावरण दिसून आल्याचे राऊत यावेळी म्हणाले. त्यामुळं कसबा आणि चिंचवड विधानसभेचा निकाल वेगळा लागू शकतो असेही राऊत म्हणाले. या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका व्हाव्यात ही लोकांची इच्छा आहे. आम्ही सर्वे केला आहे. त्यामुळं या निवडणुका लढवण्याचा महाविकास आघाडीनं निर्णय घेतला आहे. आम्हाला भूमिका स्पष्ट करायच्या असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ : Sanjay Raut Full PC : Chinchwad च्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही, MVA चे नेते बसून मिळून निर्णय घेणार
मुख्यमंत्र्यांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही : संजय राऊत
मुख्यमंत्र्यांनी जरी आवाहन केलं असेल किंवा राज ठाकरेंनी जरी पत्र लिहलं असेल तरीही कसबा आणि चिंचवडच्या निवडणुका होतीलच, असे संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही. तसा संपर्क होण्याची शक्यता देखील नसल्याचं राऊतांनी सांगितलं. अंधेरी पोटनिवडणूक हा अपवाद असला तरी तिथे निवडूक झाली होती. पंढरपूरला आणि नांदेडला देखील पोटनिवडणूक झाली होती. तिथे अपवाद पाळला नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
पुणे पोटनिवडणुकीसाठीभाजपचे उमेदवार जाहीर
चिंचवडमधून अश्विनी जगताप भाजपच्या अधिकृत उमेदवार
अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहे. सातारा हे त्यांचं मुळ गाव आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रीय असायच्या. मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहेत.
कसब्यातून हेमंत रासने भाजपचे अधिकृत उमेदवार
हेमंत रासने हे पुणे महानगर पालिकेचे भाजपचे नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेचे भाजपचे ते दोन टर्म स्थायी समिती अध्यक्ष होते. पुण्याच्या विकासासाठी त्याचं मोठं योगदान आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: