एक्स्प्लोर

Pune bypoll election 2023 : महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी, चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना - राष्ट्रवादीत रस्सीखेच

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत चिंचवड विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. पण आता महाविकासआघाडीत या जागेवर थेट उद्धव ठाकरे शिवसेनेनं दावा केला आहे.

 पिंपरी - चिंचवड:  पुण्याची कसबा विधानसभा पोटनिवडणूक (Kasaba Bypoll Election 2023) आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक (chinchwad Bypoll Election 2023)  राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या दोन्ही जागांसाठी महाविकासआघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे तर दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. असं असताना महाविकासआघाडीतील पक्षांकडून या जागेसाठी दावा केला जात आहे. एखाद्याच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पाळण्याऐवजी इथं तर महाविकासआघाडीमध्ये अंतर्गत आखाडा रंगला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत चिंचवड विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. पण आता महाविकासआघाडीत या जागेवर थेट उद्धव ठाकरे शिवसेनेनं दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंशी याबाबत चर्चा केली होती. पण सकाळ उजडताच संजय राऊतांनी धक्कातंत्र अवलंबत  थेट चिंचवड विधानसभेवर डोळा टाकलाय.  संजय राऊतांनी त्या जागेसाठी दावा का करतायत असा प्रश्न पडतो. मात्र   2019 च्या चिंचवड विधानसभेचा निकाल पाहिल्यानंतर हे  लक्षात येते.

विधानसभेवेळी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवली होती. यात कलाटे यांचा अवघ्या 38 हजारांनी पराभव झाला अन् पुन्हा ते स्वगृही परतले. तेच राहुल कलाटे या पोटनिवडणुकीसाठी तीव्र इच्छुक आहेत, म्हणूनच खासदार संजय राऊतांनी चिंचवड विधानसभेवर दावा ठोकला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने राहुल कलाटे यांनी इतकं मताधिक्य मिळवलं होतं. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेस इतक्या सहजतेने चिंचवडची जागा सोडणार नाही हे उघड आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेत महाविकासआघाडीच्या बैठकीतच हा निर्णय होईल असं स्पष्ट केलंय.

जगताप कुटुंबियांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला सुरुवात होताच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे संपर्क कार्यालय पिंपळे गुरव येथे गर्दी झाली होती. त्यासोबतच लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनादेखील उमेदवारी मिळण्याची मोठी शक्यता आहे.

 भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या रिक्त जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. अद्याप भाजपने उमेदवारी जाहीर ही केलेली नाही. आत्तापर्यंत अशा पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची प्रथा यावेळी पाळली जाईल अशी अपेक्षा असताना इथं महाविकासआघाडीने मात्र उमेदवारीसाठी अंतर्गत आखाडा रंगवलाय, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Embed widget