एक्स्प्लोर
पुण्यात तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी तिच्याच दुचाकीवरुन पसार

पुणे : पुण्यात दुचाकीस्वार महिलेच्या डोक्यावर वार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कोथरुडमधील राहुल नगर परिसरात 31 वर्षीय शुभांगी खटावकरची हत्या करण्यात आली. कर्वेनगर परिसरात राहणारी शुभांगी पहाटे 5.30 च्या सुमारास दुचाकीवरुन कामावर जात होती. त्यावेळी डोक्यात वार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे शुभांगीची हत्या केल्यानंतर हल्लेखोर तिची दुचाकी घेऊन पसार झाला. पहाटे 5.30 वाजता ही घटना घडली असून कोथरुड पोलिस तपास करत आहेत.
आणखी वाचा























