एक्स्प्लोर

Pune News: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल पंप सुरु राहणार, पेट्रोल डिझेल असोसिएशनचा एकमताने निर्णय

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत. पेट्रोल पंप बंद निर्णयावर पेट्रोल डिझेल असोसिएशनचा खुलासा केला आहे.

पुणे : हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. मात्र  या राज्यव्यापी  संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन( Pune Petrol Diesel Dealers Association) सहभागी होणार नाही. पुण्यातील सर्व पेट्रोल पंप चालू राहणार आहेत.  पेट्रोल पंप बंद निर्णयावर पेट्रोल डिझेल असोसिएशनचा खुलासा केला आहे. राज्यव्यापी संपामध्ये पुणे (Pune News) पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाही. 

केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारलेला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये संप पाळण्यात येत असून  वाहनचालक आक्रमक झाले होते. मात्र या संपात  पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील देखील सर्व पेट्रोल पंप सुरळीत चालू राहणार आहे. पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या बैठकीत एकत्रितरित्या हा निर्णय घेण्यात आला आहे.  पुणे शहरात पेट्रोल पंप सुरळीत सुरू राहणार आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सर्व पेट्रोल पंप सुरु राहतील असं सांगितलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत, असं ते म्हणाले.

ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता

 भारत पेट्रोलियम , हिंदुस्थान पेट्रेलियम , इंडियन ऑईल या इंधन कंपन्यांसह इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.   त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारचे जिल्हा प्रशासन, पोलिसांना आदेश

राज्यात पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यात पेट्रोलपंपावर वाहन चालकांची गर्दी उसळली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. त्याशिवाय, तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा अशी सूचना देण्यात आली आहे. संपात सहभागी वाहतूकदारांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत.

हे ही वाचा :

Truck Driver Strike Petrol Shortage : इंधन तुटवड्याचे संकट गडद? टँकरचालकांसोबतच्या बैठकीत तोडगा नाहीच, प्रशासनाकडून कारवाईचे संकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget