Pune Accident News: चांदणी चौकात अपघाताचं सत्र सुरूच; तेलगळतीमुळे टँकर पलटी होऊन बसला धडकला; वाहनांच्या मोठ्या रांगा, नेमकं काय घडलं?
Pune Accident News: तेलगळतीमुळे ट्रक पलटी झाली, त्याचवेळी तर प्रायव्हेट बसची ट्रकला धडक बसली आहे. जवळपास पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्या.

पुणे: पुण्यातील चांदणी चौक परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची (Pune Accident News) माहिती समोर आली आहे. तेलगळतीमुळे ट्रक पलटी झाला आहे. तर त्याचवेळी प्रायव्हेट बसची ट्रकला (Pune Accident News) धडक बसली आहे. जवळपास पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये बस चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. बस चालकाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे महामार्गावरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. चांदणी चौकातील वाहतूक ठप्प झाली आहे. तेलगळतीमुळे ट्रक पलटी झाली, त्याचवेळी तर प्रायव्हेट बसची ट्रकला धडक बसली आहे. जवळपास पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्या.(Pune Accident News)
कोथरूड परिसरात 4 वाहनांचा विचित्र अपघात
कोथरूड परिसरातील वेद भवन पुलावर आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली असून, दोन जण जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे हा विचित्र अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातामुळे काही काळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एक वाहन अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटले आणि एकामागून एक गाड्या आदळल्या. तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. दरम्यान, जखमी दोघांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोथरूड परिसरातील वेद भवन पुलावर या अपघातामुळे सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सध्या वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.वाहने भरधाव वेगाने चालवण्याचे प्रमाण वाढल्यामुळे अशा अपघातांमध्ये वाढ होत आहे. नागरिकांनी वाहने काळजीपूर्वक आणि नियंत्रणात चालवावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
चांदणी चौकात अपघाताचं सत्र सुरूच
पुण्यातील चांदणी चौकात काही दिवसांपूर्वी एक भीषण (Pune Accident) अपघाताची घटना घडली होती. एका कंटेनर ट्रकला हा अपघात झाला होती. या ट्रकमध्ये बांधकामासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणावर लोखंडी रॉड्स होते. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू (Pune Accident) झाला होता, क्लीनर गंभीर जखमी झाला होता, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, या घटनेमुळं चौकात मोठी वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती.(Pune Accident)
ही घटना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडली होती. ट्रक मध्ये असलेले लांब लोखंडी रॉड्स योग्य प्रकारे बांधले गेले नव्हते. ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारताच, मागील बाजूला असलेले रॉड्स जोरात पुढे सरकले आणि थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये चालक जागीच ठार झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. ट्रक लांब लोखंडी रॉड्स घेऊन ते चांदणी चौकातून मुंबईच्या दिशेने निघाला होती.























