एक्स्प्लोर

कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा द्या, पेट्रोलपंप मालकांना कोर्टाचा दणका

पिंपरी : पेट्रोलपंपांवर रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध सेवा-सुविधा देण्यास नकार देणाऱ्या पेट्रोल पंप मालकांना पुणे औद्योगिक न्यायालयाने दणका दिला आहे. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाचा आदेश काय? पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी, वार्षिक पगारवाढ तसेच किमान वेतन कायद्यानुसार मिळणारे सर्व लाभ घेण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. तसेच हे सर्व हक्क देण्याचे आदेशही न्यायालयाने पिंपरी येथील पिंपळे पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाला दिले आहेत. हा निर्णय शहरातील इतर पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना लागू होणार असल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. 2008 पासून न्यायालयीन लढाई पिंपरीतील पिंपळे पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू होती. या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नव्हते. तसेच साप्ताहिक व इतर सुट्ट्यांनाही व्यवस्थापन नकार देत होते. त्याचप्रमाणे तुटपुंजे वेतन देऊन जादा तास काम करून घेतले जात होते. त्याविरोधात पेट्रोल, डिझेल पंप कर्मचारी संघाने 2008 मध्ये पुण्यातील अपर कामगार आयुक्त कार्यालयात दाद मागितली. मात्र, कामगारांची पिळवणूक करणाऱ्या धनदांडग्यांची मर्जी सांभाळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अपर कामगार आयुक्त कार्यालयाने पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविली. त्यानंतर पेट्रोल डिझेल पंप कर्मचारी संघाने औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करून पिंपळे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. २००९ मध्ये दाखल केलेल्या या दाव्यावर २१ नोव्हेंबर २०१६ रोजी न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. पिंपळे पेट्रोलपंपाचे व्यवस्थापन आणि पेट्रोल, डिझेल पंप कर्मचारी संघ या दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. कायद्यानुसार पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना देखील किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळण्याचा अधिकार असल्याचे औद्योगिक न्यायालयाने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण या वेतनाबरोबरच कर्मचाऱ्यांना साप्ताहिक व इतर सुट्ट्या, वार्षिक पगारवाढ तसेच किमान वेतन कायद्यानुसार मिळणारे इतर सर्व लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने पिंपळे पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापनाला दिले आहेत. हा निर्णय शहरातील सर्व पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनाही लागू होऊ शकतो. त्यामुळे वर्षानुवर्षे पिळवणूक सहन करणाऱ्या पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यांच्या लढाईला यश! पेट्रोल, डिझेल पंप कर्मचारी संघाचे अध्यक्ष सारंग कामतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे सरचिटणीस सुरेश थोरात, सहसचिव सुदाम कर्डीले, उपाध्यक्ष राजेंद्र पालवे, खजिनदार श्यामराव येवले, अमर कोटके, पिंपळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी राजेंद्र आडसूळ, अनिल बिराजदार यांनी न्यायालयात लढा दिला. पेट्रोल, डिझेल पंप कर्मचारी संघाच्या वतीने अॅड. तळेकर व अॅड. अमित चौकडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटकाDevendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget