Porsche Car Accident Pune : अल्पवयीन मुलामुळे आजोबांचे जुने कारनामे बाहेर, छोटा राजनशी संबंध असल्याचं समोर, सुरेंद्र अग्रवालची पुणे क्राईम ब्रँचकडून चौकशी सुरु
सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे क्राईम ब्रँचने पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलवलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी करत आहे.
पुणे : पुणे कार अपघातातील (Porsche Car Accident Pune) अग्रवाल कुटुंबियांचा छोटा राजनशी संबंध असल्याची धक्कादाक माहिती समोर आली होती. त्यानंतर आता विशाल अग्रवालचे वडिल सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agrawal) यांंच्या संदर्भात पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे क्राईम ब्रँचने पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलवलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी करत आहे. महत्वाचं म्हणजे यावेळी विशाल अग्रवालदेखील या ठिकाणी हजर करण्यात आलं आहे. दोघांची आमोरासमोर चौकशी सुरु आहे.
याप्रकरणी शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी पूर्वी झालेल्या एका वादात अजय भोसले यांना ठार मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिल्याचा आरोप आहे, त्यांनी एबीपी माझासी बोलताना केला. सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचंदेखील समोर आलं. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात अगरवाल यांनी छोटा राजनचा मदत घेतली होती. या वादात अजय भोसलेची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र याप्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असनाताही पुणे पोलीसांनी केवळ आयपीसीची कलमं लावून गुन्हा दाखल केला होता. यावेळी आरोपत्र दाखल करेपर्यंत सुरेंद्र अग्रवाल यांना अटक होणं अपेक्षित होतं. मात्र यांना अटक कऱण्यात आली नव्हती.
हा सगळा प्रकार पाहून आता सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवालने मुलाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? पोलिसांची काही मदत घेतली किंवा कोणत्या मोठ्या व्यक्तीची मदत घेतली का?, याचीदेखील चौकशी पुणे क्राईम ब्रांचकडून केली जात आहे.
जातील तिकडे कायदा विकत घेतात; भोसलेंचा सुरेंद्र अग्रवालवर आरोप
सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटले होते. या सगळ्याचे पुरावे असूनही सुरेशकुमार अग्रवाल यांना अद्याप अटक होऊ शकलेली नाही. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्यांचा आर्थिक व्यवहार जोरात असल्याने ते जातील तिकडे कायदा विकत घेतात, असा आरोप भोसलेंनी केला आहे.
इतर महत्वाची बातमी-