एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींची जादू पुन्हा चालणार? ताज्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष समोर, भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पारड्यात किती जागा?

PM Modi Pune visit: पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे.

LIVE

Key Events
Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींची जादू पुन्हा चालणार? ताज्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष समोर, भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पारड्यात किती जागा?

Background

PM Modi Pune visit:  पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. आणि पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत.तसंच पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार आहेत. यामध्ये अंडरग्राउंड मेट्रोचा देखील समावेश आहे.सोबतच अनेक कार्यक्रमही नियोजित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात आज वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहे.

'या' मार्गांवरील वाहतुकीत बदल  

 पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड इत्यादी ठिकाणांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी गैरसोय होऊ नये, यासाठी या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलं आहे.

सारसबागेकडे जाणारा मार्ग खुला

टिळक रस्त्याने एस. पी. कॉलेज चौकात आल्यानंतर ना. सी. फडके चौकाकडे जाण्यासाठी (एस. पी. कॉलेज चौकातून) उजवीकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गाचा वापर करता येणार आहे.

जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद

जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी जेधे चौकातून सातारा रोड, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगड रस्ता या मार्गाचा वापर करण्याचं अवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौक, जेधे चौक या मार्गाचा वापर करण्याचं अवाहन करण्यात आलं आहे. जेधे चौकातील फ्लायओव्हरवरून सारसबागेकडे जाण्यास प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे.

पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडतील. देशभरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणस्नेही गतिमान शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने हे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल आहे.

17:44 PM (IST)  •  01 Aug 2023

Nashik Bandhara : नाशिकच्या मोहपाडा येथील वनविभागाने बांधलेला बंधारा फुटला, शेतीपिकांचे नुकसान 

Nashik Bandhara : नाशिकच्या सुरगाणा (Surgana) तालुक्यातील मोहपाडा इथं वनविभागाने बांधलेला मातीचा बंधारा फुटला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वनविभागाने मागील वर्षी या मातीच्या बंधाऱ्याचे काम केले होते. हे काम निकृष्ट झाल्याने बंधारा फुटला, त्यामुळं शेतकऱ्यांचं आणि रस्त्याचं नुकसान झालं आहे. वनविभागाने या बंधाऱ्याचं पुन्हा बांधकाम करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागलीय. तसंच उंबरपाडा येथील रस्त्यावरील मोरी पूल पुरात वाहून गेल्याने मोठे खड्डे पडले. उंबरपाडा येथीलच भारत निर्माण योजनेची पाइपलाइनही पुरात वाहून गेली आहे.  

13:37 PM (IST)  •  01 Aug 2023

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींची जादू पुन्हा चालणार? ताज्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष समोर, भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पारड्यात किती जागा?

Lok Sabha Election 2024: इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? Read More
13:22 PM (IST)  •  01 Aug 2023

 PM Modi Pune visit sharad pawar :    मोदींचे अंत:करणापासून अभिनंदन- शरद पवार

 PM Modi Pune visit sharad pawar :   टिळक पुरस्काराला आगळं वेगळं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह अशा अनेक मान्यवरांची निवड झालेली आहे. या मान्यवरांच्या पंक्तीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश झाला, याचा सर्वांना आनंद झाला. म्हणून आमच्या सगळ्यांची वतीने त्यांची निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो.

13:20 PM (IST)  •  01 Aug 2023

 PM Modi Pune visit sharad pawar :    मोदींचे अंत:करणापासून अभिनंदन-

 PM Modi Pune visit sharad pawar :   टिळक पुरस्काराला आगळं वेगळं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह अशा अनेक मान्यवरांची निवड झालेली आहे. या मान्यवरांच्या पंक्तीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश झाला, याचा सर्वांना आनंद झाला. म्हणून आमच्या सगळ्यांची वतीने त्यांची निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो.

13:13 PM (IST)  •  01 Aug 2023

 PM Modi Pune visit "लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं

 PM Modi Pune visit:  महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो,  नरेंद्र मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे.  लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारताना मला  आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीसSushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.