Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींची जादू पुन्हा चालणार? ताज्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष समोर, भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पारड्यात किती जागा?
Lok Sabha Election 2024: इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
Lok Sabha Election 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे. एकीकडे एनडीए (NDA) आघाडी वारंवार बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक साधण्याचा मेगाप्लान करत आहे, तर दुसरीकडे भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया'ची (INDIA) स्थापना केली आहे. दरम्यान, वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये जागांच्या संदर्भात अंदाज बांधण्यात आले आहेत. इंडिया टीव्ही सीएनएक्स पोलनं काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात सर्वेक्षण केलं आहे, त्याचे निकाल काय आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात...
सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?
India TV-CNX ओपिनियन पोलच्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, जर आता लोकसभा निवडणुका झाल्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) लोकसभेच्या 543 जागांपैकी 318 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवण्यात यशस्वी होईल.
तसेच, सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी इंडियाला लोकसभेच्या 175 जागा मिळू शकतात आणि प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांसह इतर पक्षांना 50 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलनुसार, पंतप्रधान मोदींच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला यावेळी लोकसभेत धक्का बसू शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी त्यांना 290 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, 52 जागा असलेल्या प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसची यावेळी संख्या 66 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
इंडिया टीव्ही सीएनएक्सचं हे सर्वेक्षण देशभरातील एकूण 44,548 प्रभावशाली मतदारांकडून त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर मिळालेल्या मतांवर आधारित आहे. सर्वेक्षणात समाविष्ट एकूण मतदारांपैकी 23,871 पुरुष आणि 20,677 महिलांनी आपलं मत दिलं आहे. सर्वेक्षणानुसार, दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांपैकी भाजपला 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत निवडणुकीत उतरल्यास इंडियाला दोन जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :