एक्स्प्लोर
पिंपरीत महिलेची आत्महत्या, मृतदेह घेण्यास कुटुंबाचा नकार
अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मयत देवीबाई पवार यांच्या कुटुंबीयांनी केली आहे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील अतिक्रमण विरोधी मोहिमेला वेगळं वळण लागलं आहे. मंगळवार अतिक्रमण पाडण्यास विरोध करताना इमारतीवरुन उडी मारलेल्या देवीबाई पवार यांचा मृत्यू झाला, मात्र त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. हॉस्पिटलबाहेर देवीबाई यांच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली आहे. अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, त्यानंतरच मृतदेह हाती घेऊ असं देवीबाई यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. पिंपळे गुरव येथील देवकर पार्कमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरु झाली. दुपारी सव्वा वाजता देवीबाई यांनी राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. यामध्ये त्यांचे दोन पाय आणि एक हात फ्रॅक्चर झाला होता. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























