एक्स्प्लोर
हुंड्यासाठी महिलेच्या शरीरात एचआयव्ही विषाणू सोडले
मात्र पोलीस तक्रारदार महिलेचा वैद्यकीय अहवाल स्वतः रुग्णालयात जाऊन तपासणार आहेत. त्यानंतरच अटकेची कारवाई केली जाईल.

(प्रातिनिधिक फोटो)
पिंपरी चिंचवड : हुंड्यासाठी एका महिलेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. तक्रारदार महिलेने डॉक्टर असणाऱ्या तिच्या पतीवर हे आरोप केले आहेत. या प्रकरणी वाकड पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलीस तक्रारदार महिलेचा वैद्यकीय अहवाल स्वतः रुग्णालयात जाऊन तपासणार आहेत. त्यानंतरच अटकेची कारवाई केली जाईल. 20 मे 2015 रोजी या महिलेचा विवाह झाला होता. तेव्हापासून फेब्रुवारी 2018 दरम्यान हुंड्यासाठी तिचा छळ सुरु होता. काही रक्कम माहेरहून आणून दिल्याचंही महिलेने सांगितलं. मात्र त्यांची अपेक्षा वाढल्याने मग महिलेने आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आजारी असताना डॉक्टर पतीने रक्तातून एचआयव्हीचे विषाणू शरीरात सोडल्याचा आरोप महिलेने केले आहेत. तसे रिपोर्ट पोलिसांकडे तिने दिले असले तरी पोलीस स्वतः महिलेला रुग्णालयात नेऊन समक्ष वैद्यकीय अहवाल तयार करणार आहेत. त्यानंतर आरोपींविरोधात अटकेची कारवाई होईल.
आणखी वाचा























