Vidhan Sabha Session : हिवाळी अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? Special Report
हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले मात्र विदर्भाच्या वाट्याला काय आले हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. विदर्भाच्या वाट्याच्या अधिवेशनात मुंबईसाठी सर्वाधिक घोषणा होत्या असा आरोप विरोधक करतायत,तर विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष भरुन काढत असल्याची आकडेवारी सरकार पुढे करतंय. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मुंबई राजधानी बनली तेव्हा नागपूर विदर्भावर अन्याय झाल्याची भावना येऊ नये म्हणून हिवाळी अधिवेशन नागपूरला घेतलं जातं. या अधिवेशनावर १०० कोटींपेक्षा जास्त खर्च केला जातो, इथे विदर्भाच्या विकासाची चर्चा होणं अपेक्षित असतं तशी ती झाली का? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
((मोंटाज- हिवाळी अधिवेशनातील चांगले व्हिज, आंदोलनं, मंत्री बोलताना, बाहेरचे आणि आतले))
हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं
सात दिवस अख्खं मंत्रिमंडळ, अधिकारी, संपूर्ण प्रशासन मुंबईतून नागपुरात डेरेदाखल झालं होतं.
विदर्भासाठी घेण्यात येणाऱ्या या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं असा प्रश्न विचारला जातोय.
याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांंनी दिलं
१ किंवा २ WIN BITE- फडणवीस - विदर्भाबद्दल
VO
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या भाषणात महायुती सरकारने
विदर्भाला न्याय दिला अशी भावना बोलून दाखवली. विदर्भासाठी दावोसमधून ५ लाख कोटींची गुंतवणूक आणली असा उल्लेखही केला.
BITE- एकनाथ शिंदे
विरोधकांनी मात्र सरकारवर टीका केली. अधिवेशन विदर्भासाठी- घोषणा मुंबईसाठी असा आरोप महाविकास आघाडीने सरकारवर केला
३ विन BITE - भास्कर जाधव+वडेट्टीवार+जयंत पाटील
मूळात हिवाळी अधिवेशन नागपूरला का घेतलं जातं यावर एक नजर टाकुयात
GFX IN
H- हिवाळी अधिवेशन नागपूरला का घेतलं जातं?
(VIDEO GFX)
स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भ हा Central Provinces and Berar प्रातांचा भाग होता.
आत्ताचा सगळा छत्तीसगड आणि मध्यप्रदेश तसंच महाराष्ट्राचा काही भाग मिळून ब्रिटीशांनी CP and Berar हा प्रांत तयार केला होता.
या मध्य प्रांताची राजधानी होती नागपूर. तर बेरार प्रांताची राजधानी होती अचलपूर.
भारत स्वतंत्र झाल्यावर विदर्भ, तत्कालीन बॉम्बे स्टेटसोबत जोडला गेला.
महाराष्ट्र राज्याची बोलणी सुरु झाल्यावर मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनणार हे पक्कं झालं
नागपूरनं आपला राजधानीचा दर्जा गमावला. हा अन्याय दूर करण्यासाठी १९५३ साली महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नागपूर करार झाला.
त्यानुसार नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळाला. विधानसभेचं एक सत्र नागपूरला होईल आणि ते किमान दोन आठवड्याचं असेल असं ठरलं.
GFX OUT
विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष किती आणि कसा भरुन काढला याची आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली
BITE-
Cm On Vidarbha Marathwada Irrigation Backlog
END PTC
((या अधिवेशनावर आपण तब्बल १०० कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करतो. किमान त्यामुळे तरी विदर्भाच्या अनुशेषावर, जनहिताच्या प्रश्नांवर, रोजच्या जगण्या-मरण्याच्या मुद्द्यांवर लोकप्रतिनिधी सजग, गंभीर राहतील अशी अपेक्षा असते.
मात्र यावेळी विदर्भातील अधिवेशनावर मुंबई महानगरपालिका निवडणुकीचीच मोठी सावली पडलेली दिसली.
अभिषेक मुठाळसह रजत विशिष्ठ/ तुषार कोहळे एबीपी माझा, नागपूर))
All Shows

































