एक्स्प्लोर

Pune Sasoon Hospital : ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस नियुक्त करायला सुरुवात; संपामुळे रुग्णांवर परिणाम होणार नाही, अधिष्ठात्यांकडून हमी

संपामुळे नागरिकांवर किंवा रुग्णांच्या उपचारावर परिणाम होऊ नये यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. 

Pune Sasoon Hospital : सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या (Old Pension Scheme) संपाचा आज तिसरा दिवस आहे. या संपाचा आता परिणाम सामान्य नागरिकांनाही व्हायला लागला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस या संपावर गेल्यामुळे याठिकाणी येत असलेल्या रुग्णांना याचा काही प्रमाणात फटका बसतो. या संपामुळे नागरिकांवर किंवा रुग्णांच्या (Sasson Hospital) उपचारावर परिणाम होऊ नये यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. 

एका महिन्यासाठी नर्सेसच्या भरतीला सुरुवात

पुण्यातील ससून रुग्णालयात हजारो रुग्ण येऊन उपचार घेत असतात मात्र या संपामुळे नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यासाठीच पुण्यातील ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस (परिचारक) नियुक्त करायला सुरुवात झाली आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी संपावर आहेत. याचा फटका पुण्यातील ससून रुग्णालयातील रुग्णांना होऊ नये यासाठी 1 महिन्याच्या कालावधीसाठी नर्सेसच्या भरतीला सुरुवात केली आहे, अशी माहिती अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी दिली आहे. 

ससून रुग्णालयातर्फे 100 नर्सेस तसेच वर्ग 4 श्रेणीचे कर्मचारी भरतीसाठी काल जाहिरात दिली होती. या पार्श्वभूमीवर आज ससून रुग्णालयात 35 नर्सेस रुजू झाल्या आहेत. संपावर गेलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी परत कामावर यावे यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना सेवेचा आभाव कुठे ही जाणवू नये यासाठी मेडिकल कॉलेज, इतर वैद्यकीय संस्थांनी ससून रुग्णालयात भरती प्रक्रियेत यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

900 नर्सेस, कर्मचारी कमी आहेत. त्यांना आवाहन करुन झालं आहे. त्यामुळे जाहिरात काढून 100 नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची 1 महिन्यासाठी प्रोसेस सुरु केली असून 35 कामावर रुजू झाले. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना देखील आवाहन करण्यात आलं आहे. त्यानुसार ते देखील येण्याची शक्यता आहे.

कामावर परिणाम होणार नाही...

मागील दोन दिवसांपासून कर्मचारी आणि नर्सेस संपावर आहेत. रुग्णालयात अनेक रुग्ण असताना या नर्सेस संपावर गेल्याने बाकी यंत्रणेवर ताण आला आहे. 900 कर्मचारी नाही आहेत. त्यामुळे रुग्णालयाची यंत्रणा कोलमडली. मात्र आम्ही पुन्हा नव्या नर्सेस रुजू करत आहोत. त्यांच्या मदतीने यंत्रणा कामाला लागणार आहे. कोणत्याही रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना याचा त्रास होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेणार असल्याचंही रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर म्हणाले. मात्र अजूनही अनेक नातेवाईकांची रुग्णालयासमोर गर्दी दिसत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Cabinet Minister : शिरसाट ते राणे, मंत्रिपद मिळताच अनेकांकडून अधिकारी फैलावरTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 24 डिसेंबर 2024 : ABP MajhaSambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रतापTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 5 PM : 24 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
Embed widget