Pune Water Supply : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' कारणामुळे पुण्यात दोन दिवस पाणी पुरवठा बंद
पुणेकरांवर पुन्हा पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. पुण्यात येत्या गुरुवारी (22 सप्टेंबरला) काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने आणि उशीरा पाणी येण्याची शक्यता आहे.
Pune Water Supply : पुणेकरांवर(Pune) पुन्हा पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. पुण्यात येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी (22, 23 सप्टेंबरला) काही परिसरात पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने आणि उशीरा पाणी येण्याची शक्यता आहे. तातडीने दुरुस्तीच्या कामासाठी पुणेकरांना पाण्याच्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दिली आहे. पुण्यात यंदा भरपूर प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शहराची पाण्याची समस्या मिटली आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर, पर्वती LLR परिसर व चिखली पंपिंग येथील विद्युत/पंपींग दुरुस्तीचं काम असल्या कारणामुळे दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. PAT पर्वती MLR टाकी परिसर गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर घोरपडे पेठ या परिसरात पाणी पुरवठा बंद असणार आहे.
पर्वती HLR टाकी परिसर : सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-1 व 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, कोंढवा खुर्द, साईबाबानगर या परिसरातदेखील पाणीपुरवठा होणार नाही.
पर्वती LLR परिसर - शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर या भागात पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना समस्येचा सामना करावा लागणार आहे.
पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली
पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण हे 99.77 टक्के भरले आहे. काल झालेल्या पावसानं आता पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 13 धरणे 100 टक्के भरली आहेत. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे पुन्हा उजनीच्या विसर्गात वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 13 पैकी निम्मे धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची समस्या मिटली आहे. मात्र शहरातील काही टाक्यांच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्याने पुणेकरांना मात्र पाणी जपून वापरावं लागणार आहे.