एक्स्प्लोर

पुण्यात कोरोनाचं थैमान, पण बुधवार पेठेत अद्याप एकही रुग्ण नाही

पुण्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाचला आहे. मात्र अतिशय गजबजलेल्या बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात मात्र कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप तरी सापडला नाही. बुधवार पेठ हा पुण्यातील एकही रुग्ण नसलेला झोन ठरला आहे.

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गहिर होत चाललं आहे. लॉकडाऊनच्या काळाच तर कोरोना बाधितांच्या आकड्याच सर्वाधिक वाढ पुण्यात झाली आहे. असे असताना देखील अतिशय गजबजलेल्या समजल्या जाणाऱ्या पुण्याच्या बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियात मात्र कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप तरी सापडलेला नाही. लॉकडाऊन लागू झाल्यापासून या  रेड लाईट एरिया मध्ये ग्राहकाचं येणे कमी झालं. या परिसरात जाणारे सर्व रस्ते पत्रे आणि काठ्या लावून बंदही करण्यात आले होते. या परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांनी कोरोनाच्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केलं. तसेच काही सामाजिक संस्थांनी ही वेळोवेळी येथील महिलांशी संवाद साधत त्यांच्या प्रबोधन केलं. या कठीण काळात कसं जगता येईल येईल याविषयी मार्गदर्शन केलं. त्यामुळेच कोरोना या भागात शिरकाव करू शकला नाही असं म्हणता येईल. कोरोना व्हायरस कम्युनिटी स्प्रेड रोखणे महत्त्वाचे का? आणि ते कसं रोखता येईल? पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात बुधवार पेठेचा हा परिसर पसरलेला आहे. या भागात हा रेड लाईट एरिया आहे.. साधारण अडीच हजार महिला याठिकाणी देहविक्री करतात. अतिशय छोटी आणि दाटीवाटीची घरं असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो असा अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात आला होता. परंतु आता 100 दिवसांहून अधिक कालावधी लोटला तरीही या रेड लाईट एरियातील एकाही महिलेला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे उघड झाले आहे. VIDEO | स्पेशल रिपोर्ट | #Corona बुधवार पेठेत कोरोनाचा शिरकाव नाही, एकही कोरोना रुग्ण नसलेला झोन  पुण्यात पहिल्यांदा लोकडाऊन सुरू झाल्यापासून येथील व्यवसाय बंद आहे. आता अनलॉक सुरु झाल्यानंतर हळूहळू ग्राहक येण्यास सुरुवात झाली आहे. हे पाहून येथील महिलांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्याजवळ असलेल्या आधीच्या पैशातून त्यांनी मास्क सनिटायझर थर्मल गन इत्यादी साहित्य खरेदी केलं आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचं थर्मलगन द्वारे तापमान तपासलं जातं आणि त्यानंतर त्याला आत प्रवेश दिला जातो. कोरोनाचा फटका जसा सर्वांना बसला तसाच फटका या महिलांना बसलाय. सध्या त्यांच्या समोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा आहे. राहत्या घराचं भाड देण्यासाठी पैसे नाहीयेत, लाईट बिल भरण्यासाठी पैसे नाहीयेत, मुलाबाळांच्या खाण्यापिण्यासाठीच्या वस्तू आणण्यासाठी त्यांना मर्यादा येत आहेत. अशा परिस्थितीत काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत या महिलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या सामाजिक संस्थांनी काही प्रमाणात त्यांच्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्याची सोय केली परंतु ही मदत तोकडी असल्याचं या महिलांचा म्हणणं आहे. त्यामुळे शासनानेही मदतीचा हात पुढे करावा अशी इच्छा येथील महिलांनी व्यक्त केली. पुण्यातील लॉकडाऊन फेल? लॉकडाऊन काळातच आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget