एक्स्प्लोर

पुण्यातील लॉकडाऊन फेल? लॉकडाऊन काळातच आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असून अॅक्टीव रुग्णांच्या संख्येत पुण्याने मुंबई, ठाण्यालाही मागे टाकले आहे. पुण्यात 14 जूनपासून लोकडाऊन सुरू आहे. पण लॉकडाऊनच्या या काळातच पुण्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंद झालीय.

पुणे : पुण्यात 14 जूनपासून लोकडाऊन सुरू आहे. पण लॉकडाऊनच्या या काळातच पुण्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंद झालीय आणि आतापर्यंतचे मृत्यूही याच कालावधीत नोंदले गेलेत. त्यामुळं पुण्यातील लॉकडाऊन अपयशी ठरल्याचा आरोप होऊ लागलाय. 23 तारखेच्या पुढे जर लॉकडाऊन वाढवण्यात आला तर आपण आंदोलन करू, असा इशारा व्यापाऱ्यांनी आधीच दिला आहे.

  • 14 जून ते 21 जुलै या कालावधीत पुणे जिल्ह्यात 16561 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत तर 344 रुग्णांचा या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालाय.
  • ६ जून ते 13 जून या आधीच्या सात दिवसांच्या कालावधीत पुण्यात 11236 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर 228 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.
  • म्हणजे लॉकडाऊनच्या या कालावधीत पुण्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यूंची संख्या नोंदली गेलीय.

ही आकडेवारीच पुण्यातील लॉकडाऊन सफल झाला की अपयशी झाला हे सांगण्यास पुरेशी आहे. व्यापारी संघटनेने तर या लॉकडाऊनला सुरुवातीपासूनच विरोध केला होता आणि आता 23 तारखेनंतर तो पुढे वाढवण्यात आला तर त्या विरोधात आपण आंदोलन करू, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय.

समूह साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का? या लॉकडाऊनचा मुख्य उद्देश कोरोना संसर्गाची समूह साखळी तोडणं हा असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, मागील सात दिवसांमधील कोरोना रुग्णांची वाढलेली आकडेवारी पाहता ही साखळी तोडण्यात यश आलेलं नाही. मुळात समूह साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का? याबद्दलच अनेक तज्ज्ञांना शंका आहे. लॉकडाऊनच्या या काळात सरकारी रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर्स फुल्ल झाल्याचं चित्र आहे. ससून, नायडू किंवा कोणत्याही शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर्स किंवा ऑक्सिजन बेड मिळत नाहीत आणि खाजगी हॉस्पिटल्स उभं करत नाहीत, अशी अवस्था पुणेकरांची झालीय.

Corona Update | मुंबईला जमलं ते ठाण्याला का नाही जमत? ही आहेत कारणे...

लॉकडाऊन करुन काय साध्य झालं? सर्वसामान्यांचा प्रश्न

अशा परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आगतिकतेतूनच मंगळवारी संध्याकाळी काही तरुणांनी त्यांच्या मित्राला रुग्णवाहिकेत घालून अलका चौकात घेऊन आले आणि तिथं त्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. लॉकडाऊनला विरोध केल्यानं शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. परंतु, नवीन आयुक्त प्रवीण कुमार यांनाही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात गेल्या आठ दहा दिवसांमध्ये यश आलेलं दिसत नाहीये. त्यामुळं दहा दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड ही दोन शहरं आणि आजूबाजूची गावं बंदिस्त करून काय साधलं असा प्रश्न विचारला जातोय.

Pune Corona | ॲक्टिव्ह केसेसमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर; वाढत्या प्रादुर्भावाला कोण जबाबदार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vikas Lawande: आधी जामीन अर्जाला विरोध, आता कोर्टात म्हटलं 'नजरचूक'! विकास लवांडेंच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह
आधी जामीन अर्जाला विरोध, आता कोर्टात म्हटलं 'नजरचूक'! विकास लवांडेंच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह
पोलीस यंत्रणा ही सरकारच्या दबावाखाली, हुकूमशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही, विकास लवांडे प्रकरणावरुन शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल
पोलीस यंत्रणा ही सरकारच्या दबावाखाली, हुकूमशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही, विकास लवांडे प्रकरणावरुन शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल
तू माझी नाही झाली, तर कोणाचीच होऊ देणार नाही, तरुणीसह तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं
तू माझी नाही झाली, तर कोणाचीच होऊ देणार नाही, तरुणीसह तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं
वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप, विकास लवांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, रोहित पवार पोलिस स्टेशनमध्ये दाखल
वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप, विकास लवांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, रोहित पवार पोलिस स्टेशनमध्ये दाखल

व्हिडीओ

Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
Umar Khalid: सात वर्षापासून जेलमध्ये असलेल्या उमर खालिदला 3 दिवसांसाठी अंतरिम जामीन; आईच्या उपचारासाठी फक्त दवाखान्यात जाण्याची परवानगी
सात वर्षापासून जेलमध्ये असलेल्या उमर खालिदला 3 दिवसांसाठी अंतरिम जामीन; आईच्या उपचारासाठी फक्त दवाखान्यात जाण्याची परवानगी
Home Loan : घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज कोणत्या बँकेकडून मिळते? जाणून घ्या
घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज कोणत्या बँकेकडून मिळते?
'नाही तर भाजपमध्ये ये...' काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर 'काॅकरोच'च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी
'नाही तर भाजपमध्ये ये...' काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर 'काॅकरोच'च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट? विधान परिषदेचा फॉर्म्युलाही ठरला!
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट?
Vinesh Phogat: 'आई होणं गुन्हा नाही, कोणत्याच खेळाडूला सूडाच्या भावनेनं वागवलं जाऊ शकत नाही' विनेश फोगाट प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची कुस्ती महासंघाला चपराक
'आई होणं गुन्हा नाही, कोणत्याच खेळाडूला सूडाच्या भावनेनं वागवलं जाऊ शकत नाही' विनेश फोगाट प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची कुस्ती महासंघाला चपराक
LIC : एलआयसीनं लाभांश, बोनस शेअर जाहीर करताच गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद, एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी
LIC : एलआयसीनं लाभांश, बोनस शेअर जाहीर करताच गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद, एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी
Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
Embed widget