Nitin Gadkari In Pune: चांदणी चौकातील पूल येत्या दोन-तीन दिवसात पाडणार; जमिनीपासून वर उडणाऱ्या बसेसची योजना जाहीर
चांदणी चौकातील पूल येत्या दोन-तीन दिवसात पाडणार त्यासाठी नवं कामदेखील लवकर सुरु करणार. लवकर काम झाल्यास येत्या जूनमध्ये नव्या पुलाचं उद्घाटन करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Nitin Gadkari In Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin gadkari) पुण्यातील (pune) वाहतूकीचा प्रश्न (traffic) सोडवण्यासाठी बैठक बोलवली होती. पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा घेतला. त्यात पुणेशहरातून अनेक शहरात जाणाऱ्या मार्गात कोणते बदल केले जाणार हे स्पष्ट केलं, टाउन प्लॅनींगनुसार या सगळ्या मार्गाची रचना होणार आहे. पुणे-शिरुर नगर- औरंगाबाद रस्त्यात तीन मजली उड्डाणपुल होणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.
चांदणी चौकातील पूल येत्या दोन-तीन दिवसात पाडणार त्यासाठी नवं कामदेखील लवकर सुरु करणार आहेत. लवकर काम झाल्यास येत्या जूनमध्ये नव्या पुलाचं उद्घाटन करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन जमिनीपासून वर उडणाऱ्या बसेसची योजना जाहीर केली. त्यासाठी निधी देण्याचंही स्पष्ट केलं. लोकप्रतिनिधींचा सहभाग यासाठी जास्त महत्वाचा असेल असंही ते म्हणाले.
इलेक्ट्रिक डबलडेकर बस पुण्यात सुरु करण्याचा विचार आहे मात्र इलेक्ट्रिक डबलडेकर बसचा खर्च भरपूर आहे. त्यासाठी विविध पर्याय देखील आहेत. केबलवर जमिनीपासून वर उडणाऱ्या बसेसचा खर्च कमी आहेे. त्याचादेखील विचार करण्याचा प्रयत्न आहे. त्यात दोन प्रकार आहेत. एक बस असेल आणि दुसरी ट्रॉली असेल. मात्र यात अनेक बाबी आहेत. ज्याचा विचार अजून होणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. नॅशनल हायवे बाजूला जागा दिली तर त्या ठिकाणी लॉजीस्टीक पार्क बांधण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठी 2 लाख कोटीचे लॉजीस्टीक पार्कसाठी खर्च करणार असल्याचं देखील त्यांनी संगितलं.
जागा अधिग्रहित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
वेद भवनचा जमिन अधिग्रमाचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाल समिती गठीत करण्याच्या सुचना दिल्या. 2019 मधे या कामाचे टेंडर दिलं होतं. नऊ वैयक्तिक मालमत्ता अधिग्रहित करायच्या होत्या. त्यापैकी सात जागा अधिग्रहित झाल्यात. दोन जागा अधिग्रहित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
चाकणजवळ 180 हेक्टरात उभारणार MMLP पार्क
चाकण एमआयडीसी पासून 27 किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. पुणे शहराभोवती होणारा अभिर्भाव लक्षात घेता चाकण एमआयडीसीपासून 27 किमी अतरावर असणाऱ्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरममध्ये हे लॉजेस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार देखील झाला आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.