एक्स्प्लोर

Supriya Sule :  अमोल कोल्हेंबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत सुप्रिया सुळेंची नाराजी; म्हणाल्या...

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी कृती असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत ही नाराजी व्यक्त केली आहे. 

Supriya Sule :  छत्रपती संभाजी महाराजांवरील (Chhatrapati Sambhaji Maharaj) महानाट्याचे मोफत तिकीट (Free tickets ) दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी (Mp Amol kolhe) पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri-Chinchwad Police) दलातील काही पोलिसांवर केला आहे. कोल्हेंच्या आरोपानंतर आता अनेक स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी असल्याचे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत ही नाराजी व्यक्त केली आहे. 

ट्विटमध्ये काय लिहिलंय?

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास  शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत अतिशय प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न खासदार डॉ अमोल कोल्हे करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगांना राज्यातील शिवप्रेमी जनता उदंड प्रतिसाद देत असताना पिंपरी चिंचवड येथील प्रयोगाच्या दरम्यान या महानाट्याच्या फुकट प्रवेशिकेसाठी येथील पोलिसांनी धमक्या दिल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळीमा फासणारी ही घटना आहे. खासदार असणाऱ्या डॉ कोल्हे यांना अशा पद्धतीने धमकी दिली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे. खासदारांना पोलीस अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल?  राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची तातडीने याची दखल घेऊन पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. 


अमोल कोल्हेंनी कोणते आरोप केले?

 पिंपरी-चिंचवड शहरातील एचए मैदानावर 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचं सादरीकरण सुरु आहे. या महानाट्याचा मोफत पास मिळावा म्हणून पिंपरी पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला आहे. नाटकाचे पास दिले नाही तर सादरीकरण कसं होतं ते बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याची माहिती देत अमोल कोल्हे यांनी खंत व्यक्त केली आहे. वर्दी ही जबाबदारीची असते याची जाणीव ठेवावी, असं डॉ. अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितलं. अद्याप फ्री पास मागितलेल्या त्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचं नाव समोर आलेलं नाही. परंतु या प्रकारामुळे पोलिसाची मान निश्चितच झुकल्याचं बोललं जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget