Rupali Patil Thombare: मारहाण प्रकरणाचे आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांना रुपाली ठोंबरेंनी धाडली नोटीस; 10 कोटींच्या अब्रुनुकसानीचा ठोकला दावा, नेमकं प्रकरण काय?
Rupali Patil Thombare: ज्या दिवशी मारहाण केल्याचा आरोप केला त्या दिवशी रुपाली ठोंबरे बीडमध्ये होत्या, त्यामुळे असं काहीही घडलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांना 10 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. रूपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यातील आता वाद शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांच्याबद्दल माधवी खंडाळकर यांनी एक पोस्ट लिहिली होती. त्यावर रुपाली पाटील यांनी मारहाण केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर माधवी यांनी चूकून व्हिडीओ पोस्ट केल्याचं सांगितलं आणि नंतर युटर्न घेतला आणि रुपाली पाटील यांनी बळजबरीने हा माफीचा व्हिडीओ शूट करुन घेतला असं माध्यमांसमोर येऊन सांगितलं. ज्या दिवशी मारहाण केल्याचा आरोप केला त्या दिवशी रुपाली ठोंबरे (Rupali Thombre Patil) बीडमध्ये होत्या, त्यामुळे असं काहीही घडलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. या प्रकरणावरुन रुपाली ठोंबरे पाटील यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.(Rupali Thombre Patil)
Rupali Patil Thombare: नेमकं काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी गुंड पाठवून मारहाण करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केला होता, याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुंड पाठवून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला होता. मारहाणीनंतर ही महिला रक्तबंबाळ झाल्याचं व्हिडीओमध्ये (Video Viral) दिसून येत होती. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात पोस्ट केल्याने मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता. मारहाण झालेल्या महिलेच नाव माधवी खंडाळकर असल्याची माहिती समोर आली होती, रूपाली पाटील ठोंबरेंवरती गंभीर आरोप केल्यानंतर काही तासांनंतर या महिलेने यू-टर्न घेतला आहे. (Rupali Patil Thombare)
Madhvi Khandalkar: माधवी खंडाळकर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलेलं
रुपाली पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकर यांनी फेसबुक लाईव्ह करुन केला होता. मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे. आम्ही जुन्या ओळखीचे आहोत. गैरसमजुतीतून वाद वाढत होते, बरेच वर्ष एकमेकांना तोंड दाखवलं नाही. हे वाद आम्ही परिवार म्हणून मिटवत आहोत. यावरून कोणीही राजकारण करू नये, असं माधवी खंडाळकर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.
Rupali Patil Thombare: रूपाली पाटील ठोंबरे यांनी या घटनेवेळी स्पष्टीकरणात म्हटलं....
तर रूपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणी एका व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये म्हटलं आहे, मी बीडमध्ये आहे. बीडमधून मी आता पुण्याला येत आहे. मग बहुतेक माझ्या आत्म्याने तिला तिथे येऊन बदडलं असेल, घरातल्या कोणी का मारलेलं आहे? काय वाद झाला आहे? या सगळ्याचा कोणताही तपशील माझ्याकडे नाही. याबाबत इतकंच कळलं आहे की, दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत. दोघेही एकमेकांच्या विरोधात तक्रार देत आहेत. काय तक्रार देत आहेत? कशाबाबत तक्रार देत आहेत? काय झालेलं आहे? याची मी निश्चित माहिती घेऊन सांगेन, सगळ्या माध्यमांना संपूर्ण महाराष्ट्राला मी माहिती घेऊन सांगेन. इथे कोणाचा काय वाद झाला आहे? कोण गंभीर आहेत? खंडाळकर कोण आहेत? माझ्या घरचे कोण आहेत? काय वाद झाला आहे? त्याची माहिती मी घेईन, दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत. एकमेकांविरोधात तक्रार देत आहेत, कोणाची चूक आहे ते समोर येईल, हा खुलासा फक्त मी बाहेर आहे बीडमध्ये आहे त्यामुळे देत आहे, असेही रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.























