एक्स्प्लोर

Sasoon Hospital Drug Racket : ससून ड्रग्स रॅकेट प्रकरण: धंगेकर, सुषमा अंधारेंनंतर नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले राज्यकर्त्यांच्या...

ससून ड्रग्स रॅकेट प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर, सुषमा अंधारेंनंतर नाना पटोलेंचं मोठं विधान केलं आहे. राज्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय ललित पाटील पळून जाणं शक्त नसल्याचं ते म्हणाले.

पुणे : पुण्यातील ससून (Sasoon Hospital Drug Racket) रुग्णालयातून ड्रग्स माफिया ललिल पाटील पळून गेल्यानंतर राजकीय नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या ससूनमधील ड्रग्स रॅकेट प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.  त्यातच राज्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय ससूनमधील ड्रग्स माफिया ससूनमधून पळून जाऊ शकत नाही, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षा नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, सुषमा अंधारे आणि आमदार रविंद्र धंगेकरांनी ससून रुग्णालयातील ड्रग्स रॅकेट प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडे या प्रकरणी ठोस पुरावे असतील. या प्रकरणी आमच्याजवळही काही पुरावे आहेत. मात्र आम्ही हे सगळे पुरावे योग्य वेळी नक्की मांडू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ड्रग्स माफिया पळून जाण्यात राजकीय हस्तक्षेप आहे. त्याशिवाय पोलिसांचा पहारा असताना पळून जाणं शक्य नाही. मात्र सुषमा अंधारेंनी नाव सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणी त्याच पुरावा देतील, असंही ते म्हणाले. 

भुसेंना बदनाम करण्याचा डाव; उदय सामंत

याच प्रकरणी आता मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. दादा भुसे यांना बदनाम करण्याचा डाव आहे. कोणी काहीही बोलावं याला अजिबात बंधन उरलेलं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. दादा भुसे हे मंत्रिमंडळातील अतिशय सक्रिय आणि प्रामाणिक मंत्री आहे, असं म्हणत त्यांनी दादा भुसेंचं कौतुक केलं आहे. 

रविंद्र धंगेकरांनी कोणते आरोप केले?

ड्रग्स माफिया ललित पाटील  पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती मागितली. मात्र, डीननी ही माहिती देण्यास नकार दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी डीनच्या केबिनमध्येच ठिय्या मांडला. डीननी माहिती न दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनच्या कारभाराबाबत सुनावले. ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

सुषमा अंधारेंनी थेट नावच सांगून टाकलं...


ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्यांनी केलेल्या आरोपामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget