(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PCMC Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये ACB ची मोठी कारवाई; महापालिकेच्या सर्वेअरला लाच घेताना रंगेहात पकडले
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या सर्वेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे
PCMC Crime News: पिंपरी-चिंचवड(PCMC) महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या सर्वेअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दुपारी अडीचच्या सुमारास झाली. या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.
संदीप लबडे असे लाच घेणाऱ्या सर्वेअरचं नाव आहे. लबडे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात सर्वेअर म्हणून कार्यरत आहेत. लबडे यांनी आधी तीन आणि काम झाल्यानंतर साडेतीन लाखांची लाच मागितली होती. तक्रारदार काम करत असलेल्या कंपनीचे विकास योजनेचा अभिप्राय देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. महापालिकेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे यापूर्वीच महापालिका विभागात कारवाई करण्यात आली आहे. दुपारीच लबडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
यापुर्वी पुण्याजवळील शिरगाव येथील अंगणवाडीत विद्युत कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी व वॉटर फिल्टर मशीन बसविण्यासाठी आरोपीने ठेकेदाराकडे 2500 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचून शेटे आणि हेळकर यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात रंगेहाथ पकडले होते. शिरगाव येथील अंगणवाडीत विद्युत कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी व वॉटर फिल्टर मशीन बसविण्यासाठी आरोपीने ठेकेदाराकडे 2500 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचून शेटे आणि हेळकर यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात रंगेहाथ पकडले होते.
1 कोटी रुपयांची अपसंपदा जमवल्याप्रकरणी पुण्यातील मनपा उपायुक्तांवर गुन्हा दाखल
पुणे महापालिकेतील उपायुक्त विजय लांडगे आणि त्यांची पत्नी शुभेच्छा लांडगे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गैरमार्गाने मालमत्ता कमावल्याबद्दल अटक केली होती. तब्बल 1 कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमवल्याप्रकरणी त्यांंच्यावर कारवाई करण्यात आला होता. ज्ञात उत्पन्नापेक्षा लांडगे पती- पत्नींकडे 31.59 टक्के जास्त मालमत्ता आढळून आली होती. विजय लांडगे हे पुणे महापालिकेतील आकाशचिन्ह विभागात उपायुक्त आहेत. या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी ही बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच म्हणणं होतं. लांडगेंकडे एक कोटी दोन लाख साठ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली होती. मोठा अधिकारी गाळाला लागल्याने खळबळ उडाली होती.