एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक विस्कळीत

तीन तासांच्या खोळंब्यानंतर दोन लेन सुरु, मात्र पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
चिंचवड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्यांसाठी बॅड न्यूज. सततच्या होणाऱ्या अपघातांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अमृतांजन पुलाजवळ दोन लेन बंद करण्यात आल्या आहेत.
दुरुस्तीच्या कामासाठी पुण्याकडे जाणाऱ्या दोन लेन बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खंडाळ्याच्या घाटात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे आख्ख्या घाटात वाहतूक मुंगीच्या गतीनं पुढे सरकत आहे.
अमृतांजन पुलाजवळ कायमच वाहनांचा खोळंबा होतो. त्यात आज सकाळी टँकर उलटल्याने इथली वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यावर कडी म्हणजे दोन लेन बंद झाल्यानं वाहतुकीचा बोऱ्या वाजला आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























