Mumbai Pune Express Highway Accident Update: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टँकरला आग; चार जणांचा होरपळून मृत्यू, वाहतूक ठप्प
Mumbai Pune Express Highway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली आहे. मागील एक तासांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Mumbai Pune Express Highway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली आहे. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन जाणारा ऑईल टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी आला. त्यामुळे आग जास्त भडकल्याची माहिती मिळत आहे.
टँकरला आग लागल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणावर ऑईल पसरलं आहे. या आगीत चौघांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
केमिकल घेऊन भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला, यामुळं टँकर स्लिप झाला, या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला. मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले, खालून जाणाऱ्या मार्गावर ही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली. खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे. या टँकरची आग विझावण्यासाठी फायर ब्रिगेडला फोमच्या गाडीची आवश्यकता आहे. मात्र सध्या IRB यंत्रणा पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. काही किरकोळ जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
ब्रिजच्या खालच्या गाड्याही जळून खाक
ब्रिजच्या वर ऑईल टॅंकरला भीषण आग लागल्याने ब्रिजच्या खालीदेखील या आगीच्या झळा पोहचत आहे. त्यासोबतच ब्रिजच्या खालच्या दोन ते तीन गाड्यांनादेखील आग लागली आहे. मात्र ट्रॅंकर ऑईलचा असल्याने स्फोट होण्याची भीती अग्निशमन दलाचे जवान व्यक्त करत आहे. असं असलं तरी मागील तासाभरापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरु असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पावसाने हजेरी लावल्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुलावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक हळू हळू सोडण्यात येत आहे मात्र मुंबई दिशेने येणारी वाहतूक अजूनही बंदच ठेवण्यात आली आहे.
दोघांचा होरपळून मृत्यू तर दोन जखमी...
या लागलेल्या भीषण आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे तअपघात झाल्यानंतर हे मदतीची याचना करत होते. अग्निशमन दलाच्या जवानांकडून यांना मदत करण्यात आली मात्र दुर्दैवाने चौघांचा मृत्यू झाला आणि गंभीर जखमी असलेल्या दोघांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आग अत्यंत भीषण असल्याने आणखी काही लोक यात अडकले आहेत का?, याची माहिती घेत आहेत. जर काही प्रवासी किंवा चालक अडकले असतील तर मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.