मोठी बातमी : डॉ. अजय तावरेंसाठी आमदार सुनील टिंगरेंची शिफारस, हसन मुश्रीफांची मंजुरी, पत्र 'माझा'च्या हाती!
Pune Accident Case , Ajay Taware and Sunil Tingare : पुणे अपघात प्रकरणात अनेकांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याने बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय.
Pune Accident Case , Ajay Taware and Sunil Tingare : पुणे अपघात प्रकरणात अनेकांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याने बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान, अजय तावरेंसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून 2023 मध्ये शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले होते. सुनील टिंगरेंचे पत्र एबीपी माझाच्या हाती आले आहे.
लाडक्या लेकासाठी विशाल अग्रवालांचे अजय तावरेंना फोन वर फोन
सून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याने विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी चांगलाच भ्रष्ट कारभार केलाय. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी दुसरेच सॅम्पल घेऊन ते तपासल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामुळे पुणे अपघात प्रकरणात अनेकांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासामध्ये श्रीहरीने हे कृत्य डॉ. अजय तावरेच्या सांगण्यावरून केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याने रक्ताचे नमुने बदलले होते. पुणे पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरातून त्याला अटक केली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
रवींद्र धंगेकरांचे गंभीर आरोप
डॉ. तावरे यांनी यापूर्वीही ब्लड सॅम्पल्स बदलण्यासारखी कामे केल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. अजय तावरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. 29 डिसेंबर 2023 रोजी अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते. तर हसन मुश्रीफ यांनीही तावरे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते.
#WATCH | On being asked about doctors arrested over manipulation of blood sample in Pune road accident case, Maharashtra medical education & special assistance minister, Hasan Mushrif says, "An inquiry will be setup and they will be suspended." pic.twitter.com/nE49arhR18
— ANI (@ANI) May 27, 2024
इतर महत्वाच्या बातम्या