एक्स्प्लोर
पुरुषाच्या पोटात गर्भाशय असल्याचा अहवाल, रुग्णालयाचा भोंगळ कारभार
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं चक्क पुरुषाच्या पोटात गर्भाशय असल्याचा धक्कादायक अहवाल दिला आहे.
पुणे : पुण्यातलं दिनानाथ मंगेशकर रुग्णालय भोंगळ कारभारावरुन पुन्हा चर्चेत आलं आहे. पोटदुखीवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं चक्क पुरुषाच्या पोटात गर्भाशय असल्याचा अहवाल दिला आहे.
पोटदुखीनं त्रस्त असलेले पुण्यातील सागर गायकवाड हे 7 मे रोजी फॅमिली डॉक्टरकडे गेले, त्यानंतर डॉक्टरांनी गायकवाड यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सागर गायकवाड यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सोनोग्राफी केली. पण हा अहवाल पाहून गायकवाड यांना धक्काच बसला. कारण की, या अहवालात गायकवाड यांच्या पोटात चक्क गर्भाशय असल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलं होतं.
या प्रकारानं चकित झालेल्या गायकवाड यांनी तात्काळ दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि दुसऱ्यांदा तपासणी केली. यावेळी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल चुकीचा असल्याचं निष्पन्न झालं. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे सागर गायकवाड यांना तब्बल दोन महिने तणावाखाली घालवावे लागले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं मात्र गुपचिळीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे नामांकित रुग्णालयच जर रुग्णाच्या जीवाला गंभीरतेने बघत नसतील तर रुग्णांनी जायचं कुठं? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement