Ramnath kovind In Pune: 27 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुणे दौऱ्यावर
Ramnath kovind In Pune: देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 27 मे रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहे. दत्त मंदिराच्या शताब्दी राजा जयंती वर्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
Ramnath kovind In Pune: देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहे.पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या शताब्दी राजा जयंती वर्षाचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार फलोत्पादन क्रांतीचे जनक, रायझ अँड शाईन बायोटेकचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक तथा डॉ.डी.वाय.पाटील, अभिमत विद्यापीठ पिंपरीचे कुलगुरू भाग्यश्री पाटील, लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ज्ञ डॉ.प्राजक्ता काळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा शुक्रवारी (२७ मे) दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दत्त मंदिराच्या 125 वर्षांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या लक्ष्मीदत्त या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन होणार आहे.
14 जून मोदींचा पुणे दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहे.त्यात ते देहूमध्ये येणार आहेत.संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे अन् शिळा मंदिराचे पंतप्रधानांच्या लोकार्पण हस्ते होणार आहे. यासाठी देहू संस्थानने मार्च महिन्यात मोदींना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं आहे. मोदींनी येत्या 14 जूनची वेळ दिली आहे, अशी माहिती देहू संस्थानने दिली आहे.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू इथे येणार आहेत. त्यामुळे देहूतील नागरिक मोदींच्या स्वागाताच्या तयारीला लागले आहेत. अनेक दिंड्यांना यावेळी आमंत्रित केलं जाणार आहे.
दरम्यान, 27 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही पुणे दोऱ्यावर असणार आहे. त्यामुळे पुणेकर दोघांच्या स्वागताची तयारी जोमात तयारी सुरु आहे.