Pune Bypoll Election : कसबा काँग्रेसला तर चिंचवड राष्ट्रवादीला? पोटनिवडणुकीसाठी 'या' उमेदवारांची नावे निश्चित; सूत्रांची माहिती
Election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या (Congress) तर चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Pune Bypoll Election : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आला आहे. तर चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर होणार
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा मतदारसंघ हा राष्ट्रावादी काँग्रेसला सुटला आहे. तर चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर चिंचवडमधून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना मौदानात उतरवण्यात आले आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दोन्ही जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणीवस
आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांची भेट घेतली. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीने आपले उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच आता फडणवीस यांच्या मनातील उमेदवार नेमका कोण? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही एकत्रीत लढणार : संजय राऊत
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही एकत्रीत लढणार असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यांचा पराभव व्हायला पाहिजे. हे आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिल्याचे संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या: