एक्स्प्लोर

 PCMC Water Issue: पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही पाणीकपातीची शक्यता; पवना धरणात 16 टक्के पाणी शिल्लक

गेल्या वर्षी आजच्या तारखेला 35 टक्के पाणी साठा निर्माण झाला होता. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत तर शहरातील नागरिकांवर पाणी कपातीची कुऱ्हाड कधी ही पडू शकते.

PCMC Water Issue: पिंपरी चिंचवडमध्येही काही दिवसात पाणीकपात होण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळ्यात त्यांच्यावर पाणी कपातीच संकट ओढवणार आहे. पाठ बंधारे विभागाने पाणी कपात करण्याच्या सूचना महपालिकेला दिलेल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात धरणात केवळ साडे सोळा टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला 35 टक्के पाणी साठा निर्माण झाला होता. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत तर शहरातील नागरिकांवर पाणी कपातीची कुऱ्हाड कधी ही पडू शकते.
 
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत साडे 500 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा अवघ्या दोनशे तीस मीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळेच जुलैमध्ये पिंपरी चिंचवड शहरावर पाणी कपातीची कुऱ्हाड कोसळणार आहे. पाटबंधारे विभागाने अशा प्रकारची चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे याच पवना धरणातून ज्या पवना नदी मध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो ती देखील अतिशय संथ गतीने वाहते आहे. पवना नदीच्या दुतर्फा अनेक गावं वसलेली आहेत त्या गावाची शेती या पवना नदी वरती अवलंबून असते ते शेतकरी देखील आता चिंतेत आहेत. त्यांनी पेरणी केली परंतु ज्या अपेक्षेने त्यांना पावसाची ओढ होती तो पाऊस मात्र अद्याप झाला नाहीये. पाटबंधारे विभागानं पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला दिलेल्या आहेत. मात्र ऐन पावसाळ्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्याने शहरवासीय चिंतेत आहे.

पुण्यात एकदिवसाआड पाणीपुरवठा
धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) अखेर पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. खडकवासला धरण प्रकल्पात केवळ दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवले होते. पावसाला विलंब झाल्यास परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे. पुण्यात पूर्वीपासूनच असमान पाणीपुरवठा आहे. सध्या काही भागात दिवसभर पाणी असते, तर बहुतांश भागात दिवसातून एकदाच पाणी येते. त्यामुळे तेथे पाणीकपात लागू केल्यास नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळणार नाही. त्यामुळे पाणी कपातीनंतरही पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी पर्यायी दिवशी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Rohit Pawar and Vikram Pachpute: पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Embed widget