एक्स्प्लोर

Lonavala Bhusi Dam: फक्त पंधरा मिनिटांच्या पावसानं प्रवाह वाढतो, पाण्याचा अंदाज नसेल आला...; भुशी डॅम परिसरात बचावकार्य करणाऱ्यांनी सांगितलं काय घडलं?

Lonavala Bhusi Dam Family Drown in Waterfall: लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे.

Lonavala Bhusi Dam: पुणे : भुशी डॅम (Bhusi Dam) परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. 

वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला (Lonavala News) गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आलं आहे. दरम्यान, बुडालेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एक अद्याप बेपत्ता आहेत. उर्वरित शोधकार्य आज करण्यात येणार आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे पाच जण वाहून गेले आहेत. हे सर्वजण अन्सारी कुटुंबातले आहेत. यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुहास दिवसे घटनास्थळी पोहोचले आहेत.

भुशी डॅमजवळ वाहून गेलेल्यांना वाचवण्यासाठी ज्यांनी बचावकार्य केलं, त्या शिवदुर्ग टीममधील गावडे यांनी सांगितलं की, "पाऊस जास्त झाल्यानंतर लोणावळ्याकडे पर्यटक येत असतात. असंच हे कुटुंब होतं. हे कुटुंब एका लग्नसमारंभासाठी आलं होतं. समारंभ पार पडल्यापासून ते भुशी डॅमजवळ असलेल्या धबधब्यावर आले. इथे साधारणतः दुपारी साडेबाराच्या सुमारास ते गेले होते. या ठिकाणी अचानक पाऊस वाढला. या ठिकाणी 15 मिनिटांसाठी जरी पाऊस पडला तरीदेखील धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाढतं. या पाण्याचा या कुटुंबाला अंदाज आला नाही त्यामुळेच दुर्घटना घडली. हा धबधबा पुढे जाऊन भुशी डॅमला मिळतो. आम्हाला आतापर्यंत सापडलेले मृतदेह सर्व भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये सापडले आहेत. आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे."

"आम्हाला या दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यावेळी आम्ही त्वरित आमची टीम घेऊन याठिकाणी पोहोचलो. त्यानंतर आम्हाला भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये तीन मृतदेह आढळले. भुशी डॅममध्ये आम्हाला एका महिलेचा मृतदेह, एक 13 वर्षीय मुलीचा मृतदेह आणि सात वर्षांचा मृतदेह सापडला. अशा तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री साडेसात वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होतं. पण अंधार पडल्यामुळे आम्हाला सर्च ऑपरेशन थांबवावं लागलं. ज्या ठिकाणी डेडबॉडी सापडल्यात त्याच ठिकाणी आप सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.", अशी माहिती बचावकार्य करणाऱ्यांनी केली आहे. 

पाहा व्हिडीओ : Bhushidam Familly : पाण्यचा जोर वाढला, अडकले, जीव गमावला, घटना नेमकी कशी घडली?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget