एक्स्प्लोर

Pune Drug : ड्रग्ज रॅकेटचा वापर झाला अन् ललित पाटील नेपाळमार्गे परदेशात पळाला? दोन आठवड्यानंतरही थांगपत्ता नाही

Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटीलने ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय रॅकेट तयार केलं होतं, त्याचा त्याला फायदा झाला. 

पुणे: ड्रग माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital Drug Racket) पसार होऊन आज दोन आठवडे झाले. पण पुणे पोलिसांनी जंग जंग पछाडूनही ललित पाटील हाती लागलेला नाही. आपल्या ड्रग रॅकेटचा उपयोग करून ललित पाटील परदेशात पळून गेल्याची शक्यता व्यक्त होतेय. कारण या आधी त्यानं मलेशिया, थायलंड आणि दुबईमध्ये मेफेड्रोन एस्कपोर्ट केल्याचं समोर आलं आहे . 

ललित पाटील 2 ऑकटोबरला ससूनमधून अगदी निवांतपणे बाहेर पडला. नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन तो पुन्हा ससूनमधील कैद्यांसाठी असलेल्या कोठडीत परत येईल असं बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना वाटलं होतं. पण ससूनमधून अलगदपणे निसटणाऱ्या ललित पाटीलने सुसाट वेगानं नेपाळ बॉर्डर गाठली. त्याच्या मागावर असलेले पुणे पोलीस त्याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बालकावडेला तर पकडू शकले, पण मास्टरमाइंड ललित मात्र पोलिसांच्या ताब्यातून निसटला तो निसटलाच. 

शेळ्या एक्सपोर्ट करण्याचा व्यवसाय

ललित पाटील होता तर ड्रग माफिया, पण कोणाला संशय येऊ नये म्हणून देश - विदेशात शेळ्या एक्स्पोर्ट करणाऱ्या व्यवसायिकाचा मुखवटा त्यानं परिधान केला होता. भाऊ भूषण पाटीलसह त्यानं दुबईला शेळ्या पाठ्वल्याच रेकॉर्ड उपलब्ध आहे. पण शेळ्यांच्या नावाखाली त्यानं मेफेड्रोन दुबईला पाठवल्याच पोलीस सूत्रांच म्हणणं आहे. त्याचबरोबर मलेशिया, थायलंड या इतर देशांमध्ये देखील ललित पाटीलने मेफेड्रोन पाठवलं होत आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच नेटवर्क तयार झालं. याच नेटवर्कचा उपयोग करून ललित पाटील भारताबाहेर पळाल्याची शक्यता आहे . 

पुणे पोलिसानी ललिताचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांच्याकडे पाच दिवस चौकशी केल्यानंतर ते तपासात सहकार्य करत नसल्याचं सोमवारी न्यायालयात सांगितलं. त्यांच्याकडून पोलिसांनी पेन ड्राइव्ह आणि इतर साहित्य जप्त केलेलं. नाशिक एम आय डी सी मधील मेफेड्रोन तयार करणाऱ्या कारखान्याची पोलिसांनी तपासणी केली. दोघांच्या घरी जाऊन घरच्यांकडेही चौकशी करून झाली. पण ललिताचा थांगपत्ता लागत नाही. 

ललित पाटील पळून गेला की त्याला पळवलं?

ललित पाटील पळाला की त्याला पळवून लावलं हा प्रश्न तर पहिल्या दिवसापासून विचारला जातोय. कारण तो पकडला गेला तर एक नाही तर अनेकांचा बिंग फुटणार आहे . पुणे पोलीस दलातील नऊ कर्मचाऱ्यांना या आधीच या प्रकरणात निलंबित करण्यात आलयं तर ससूनच्या व्यवस्थापनाची चौकशी करणाऱ्या चार सदस्यीय चौकशी समितीने ललितवर उपचार करणाऱ्या सहा डॉक्तरांचे जबाब नोंद केलेत. पण राजकीय विरोधकांनी जे आरोप केलेत त्या आरोपांना गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अजून उत्तर दिलेलं नाही. 

रात्र आणि दिवस प्रयत्न करून देखील पुणे पोलिसांची दहा पथकं ललित पाटीलला शोधू शकलेली नाहीत. त्यामुळं पुणे पोलीस दलावर प्रचंड दबाव आहे. ललित पाटील या आधी देखील अनेकदा ससूनमधून बाहेर येऊन पुण्यात वेगवगेळ्या ठिकाणी त्याच्या साथीदारांना भेटत असल्याचं समोर आलंय. पुण्यातील सोमवार पेठेत तो त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे सोबत फिरताना सीसीटीव्ही मध्ये दिसतोय. तो जिथे जिथे गेला होता त्या सगळ्यांची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणात लवकरच आणखी काही जणांना अटक करण्यात येईल अशी शक्यता आहे. मात्र जोपर्यंत स्वतः ललित पाटील सापडत नाही तोपर्यंत ललित पाटीलला नक्की कोण वाचवत होतं हे रहस्य कायम राहणार आहे. 

स्थानिक पातळीवर पोलीस आणि डॉक्टरांचं घट्ट जाळं ललित पाटीलने स्वतःच्या बचावासाठी विणलं होतं. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा तो भाग होता. त्यातूनच मलेशिया आणि थायलंड सारख्या देशांमध्ये त्यानं मेफेड्रोन पाठ्वल्याच समोर आलं आहे. हे ड्रग सिंडिकेट तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतच आहे शिवाय तो कधी सापडूच नये अशी भारतातील अनेकांची इच्छा आहे. सामान्यांना मात्र ललित पाटीलला पाठीशी घालणारे नक्की कोण आहेत हे समोर येईल अशी भाबडी आशा आहे. आता पपुणे पोलीस कोणाच्या विश्वसाला पात्र ठरतात हे पाहायचं आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Embed widget