एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्याचा युवा माऊंटन बाईकर अजय पडवळचा लडाखमध्ये मृत्यू
पुण्याचा युवा माऊंटन बाईकर अजय पडवळचा लडाखमध्ये मृत्यू
पुणे : पुण्यातील युवा माऊंटन बाईकरचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू झाला आहे. 22 वर्षीय अजय पडवळच्या डोक्याला मार लागल्याने त्याला प्राण गमवावे लागले. अजय पडवळने किक चित्रपटात सलमानचा बॉडी डबल (डमी) म्हणून स्टंट्स केले आहेत.
लडाखमधील सर्वात उंच माऊंटन पास खारदुंग-ला जवळ अजयला अपघात झाला. अजय त्याच्या मित्रांसोबत कारगिल आणि लेह-लडाखला भटकंतीसाठी गेला होता. मंगळवारी सकाळी तो खारदुंग-ला परिसरात एकटाच गेला होता. दुपारी तो रस्त्यावर पडलेला आढळला.
अजयला लेहमधील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला अनेक जखमा झाल्या होत्या, तर त्याच्या कवटीला चीर गेली होती. तो एकटा असल्यामुळे अपघात नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
विशेष म्हणजे सायकलिंग करताना त्याने हेल्मेट घातलं असतानाही त्याला इतकी गंभीर दुखापत कशी झाली, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत तो व्हेंटिलेटरवर होता. अखेर ब्रेन हॅमरेजमुळे त्याचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
Advertisement