एक्स्प्लोर
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : 57 पदकांसह महाराष्ट्र अव्वल
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तिसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राने 15 सुवर्ण, 19 रौप्य आणि 23 कांस्य अशा 57 पदकांची कमाई केली आहे.

पुणे : पुण्यातल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी बजावली आहे. 57 पदकांची कमाई करत तिसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राने पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत 15 सुवर्ण, 19 रौप्य आणि 23 कांस्य अशा 57 पदकांची कमाई केली आहे. दिल्लीच्या मुलामुलींनी 13 सुवर्णपदकांसह एकूण 36 पदकं पटकावली आहेत. हरयाणाने तिसऱ्या दिवसअखेर 12 सुवर्णपदकांसह एकूण 40 पदकं मिळवली आहेत. दिल्ली आणि हरयाणा पदकतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. महाराष्ट्राचा नव्या दमाचा पैलवान दिग्विजय भोंडवेला खेलो इंडियात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. खेलो इंडियातल्या 21 वर्षांखालील मुलांच्या ग्रीको रोमन कुस्तीत त्यानं 97 किलोचं कांस्यपदक मिळवलं. दिल्लीत नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दिग्विजय हा 97 किलोत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. खेलो इंडियात दिग्विजयला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं असलं, तरी त्याची कामगिरी अपेक्षा उंचावणारी आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























