आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याची पिंपरीत चर्चा!
पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी गोळीबाराचा बनाव केला असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? या प्रश्नाला आयपीएस कृष्ण प्रकाश यांनी बगल दिली. त्यामुळे नेहमीच आक्रमक असणारे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची भाषा करणाऱ्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर राज्य सरकारमधील कोणाचा दबाव आहे का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी गोळीबाराचा बनाव केला असेल तर आमदारांवर गुन्हा दाखल करणार का? पत्रकारांच्या या प्रश्नाला आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बगल दिली. यानिमित्ताने कृष्ण प्रकाश यांचा नेहमीचा आक्रमकपणा, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची भाषा गायब झाली. त्यामुळे पोलीस आयुक्तांवर राज्य सरकारमधील कोणाचा तरी दबाव आहे का? अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे. शिवाय घटनेला आज सात दिवस पूर्ण होतील, तरी देखील हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेला आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडेपर्यंत पोलीस पोहचू शकलेली नाही. हा त्या दबावाचा एक भाग आहे का? असा ही प्रश्न विचारला जात आहे.
'मटणवाले चाचा' IPS कृष्णप्रकाश...! वेशांतर करुन पोलिसांची घेतली भन्नाट 'परीक्षा'!
परंतु ही शैली कृष्ण प्रकाश यांना साजेशी नव्हती. कारण नेहमीच आक्रमक असणारे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची भाषा करणारे कृष्ण प्रकाश यावेळी मात्र मवाळ दिसून आले. त्यामुळे याप्रकरणात त्यांच्यावर राज्य सरकारमधील कोणाचा तरी दबाव आहे का? अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
दुसरीकडे आज या घटनेला सात दिवस पूर्ण होतील. यात परस्परविरोधी हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. आमदार पुत्रावर तर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे आहेत. पण आत्तापर्यंत केवळ गोळीबाराचा आरोप असलेला तानाजी पवार आणि आमदारांच्या चार समर्थकांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र पोलीस आमदार पुत्र आणि त्यांच्या पीएपर्यंत पोहोचू शकलेले नाही. त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याने, तो फोन स्विच ऑन होण्याची वाट पोलिसांकडून पाहिली जात आहे, असा वेळकाढूपणा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या पोलिसांकडून सुरु आहे. त्यामुळे हा देखील त्या दाबावाचा भाग आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.