(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात लष्कराचा गणवेश घालून फिरणारा संशयित ताब्यात
कमांड हॉस्पिटलची इमारत आणि आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजची इमारत जवळजवळ आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी कमांड हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रॅक्टिस करत असतात.
पुणे : पुण्यातील लष्कराच्या कमांड हॉस्पिटलच्या प्रांगणात संशयितरित्या फिरणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. काल संध्याकाळी सातच्या सुमारास लष्कराने ही कारवाई केली. लष्कराने या संशयित व्यक्तीला वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
लष्कराच्या कमांड हॉस्पिटलच्या परिसरात एक व्यक्ती आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजचा युनिफॉर्म घालून फिरत होता. त्यावेळी लष्कराच्या जवानांना संशय आल्याने त्यांनी त्याला हटकलं. जवानांनी संशयीत व्यक्तीची कसून चौकशी करत त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे काही बनावट कागदपत्रे आणि काही वस्तूही मिळाल्या आहेत.
कमांड हॉस्पिटलची इमारत आणि आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजची इमारत जवळजवळ आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी कमांड हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रॅक्टिस करत असतात.
लष्कराने या व्यक्तीला वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. वानवडी पोलीस पुढील तपास करत आहेत. आज वानवडी पोलीस कोर्टामध्ये हजर करतील.