एक्स्प्लोर
Advertisement
माझं मुंबईत अपहरण झालं, सुप्यात बेशुद्धावस्थेत सोडलं; पार्थ पवार यांच्या ड्रायव्हरचा दावा
ओमनी व्हॅनमध्ये बसल्यानंतर काही अंतर पार होताच आपण बेशुद्ध पडलो. पुढचं आपल्याला काही आठवत नसून आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर जवळ बेशुद्धावस्थेत सोडून दिल्याचं मनोज सातपुतेंचं म्हणणं आहे.
पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या गाडीच्या चालकाने त्याचं अपहरण झाल्याचा दावा केला आहे. मनोज ज्योतिराम सातपुते असं पार्थ पवार यांच्या गाडीवर काम करणाऱ्या चालकाचं नाव आहे. ओमनी गाडीतून मुंबईत अपहरण करुन पुणे-नगर महामार्गावरील सुपा इथे बेशुद्धावस्थेत सोडून दिल्याच मनोज सातपुते यांनी सांगितलं.
मनोज सातपुतेंच्या दाव्यानुसार, 5 जुलै रोजी मुंबईतील कुलाबा इथे उभा असताना एक ओमनी व्हॅन त्याच्याजवळ येऊन थांबली. ओमनीमधील लोकांनी तू पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक आहे का, असं विचारुन आम्हाला पार्थ पवार यांना भेटायचं आहे, त्यांच्याकडे आम्हाला घेऊन चल असं म्हणून मला गाडीच्या पुढच्या सीटवर बसवलं. ओमनी व्हॅनमध्ये बसल्यानंतर काही अंतर पार होताच आपण बेशुद्ध पडलो. पुढचं आपल्याला काही आठवत नसून आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर जवळ बेशुद्धावस्थेत सोडून दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 जुलै रोजी सकाळी आठ वाजता मला बेशुद्धावस्थेत पुणे-नगर महामार्गावर सुपे इथे रस्त्याच्या कडेला सोडलं, अस मनोज सातपुतेंनी सांगितलं. शुद्धीवर आल्यावर मनोज सातपुते पारनेरपासून जवळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील सणसवाडी या त्याच्या गावी पोहोचले आणि शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. शिक्रापूर पोलिसांनी झीरो नंबरने अपहरणाचा गुन्हा नोंद केला असून तो गुन्हा कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement